मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अत्त दीप भव...!

अत्त दीप भव...! स्वयं प्रकाशमान व्हा..! गौतम बुद्ध सांगतात - ''तुम्ही स्वयं प्रकाशमान व्हा.!'' "स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका."  अडिच हजार वर्षांपूर्वी मानवला मुक्तीचा,जिवन जगताना काय करावं काय करू नये याबद्दल त्यांनी सांगुन ठेवलं आहे.त्याच अनुषंगाने हे लिखाण.....! दु:खापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभराची सगळी धडपड सुरू असते..त्या इच्छेपोटी सर्वांचा खटाटोप सुरू असतो. पण त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्गच आजही योग्य आहे..! #तृष्णा पासून मुक्ती..! मुळात आपण जिवन जगताना वरवरच्या गोष्टींना नेहमीच फार प्राधान्य देतो.सध्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती व तंत्रज्ञानाचे, जाहिरातीचे आणि संगणकाचे आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ परिणाम हवा असतो.आपणांस आपल्या आजुबाजूला धावते जग दिसून येईल सर्वत्र..! प्राचिन काळापासून आजतागायत झालेले बदल सुध्दा लक्षात येतील...! पूर्वी माणुस कसा जिवन जगायचा आणि आज कशाप्रकारे जिवन जगत आहे तरी सुद्धा त्याला समाधान मिळतं नाही..!आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या गरजा या वाढतच अस...