मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"चिंता नाही, तर काळजी घेऊया. क्षयरोग हद्दपार करूया...!"

#जागतिक_क्षयरोग_दिन #विशेष_लेख  "चिंता नाही, तर काळजी घेऊया. क्षयरोग हद्दपार करूया...!"   सावधान रस्त्यावर थुंकताय? टीबी होऊ शकतो...! थोडक्यात शिंकणे, खोकणे, थुंकणे या मार्गाने क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात. क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग एके काळी हा दुर्धर समजला  ‌रोग आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. या आजारावर उपचार पध्दती अस्तित्वात आहेत आणि विकसित झालेल्या आहेत म्हणून आपण या आजारा बद्दल हलगर्जीपणा राखणे महाग पडू शकते. चला तर माहिती करून घेऊया जागतिक क्षयरोग दिनानिमित्त काय खबरदारी पाळायला हवी. आणि या रोगरातून कायमस्वरूपी मुक्तता घेण्यासाठी काय करावे हवे..? जागतिक टीबी दिन जगभर बुधवार दि. २४ मार्च, आज रोजी पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने टीबीचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त होताना टीबीच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याची अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्या संदर्भात छातीरोग तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले जात आहे . 'रस्त्यावर थुंकल्याने टीबीचे जंतू हवेत तरंगतात. सुमारे ५ ते ७ दिवस हवेत तरंगत राहतात. त्या दरम्यान हे जंतू हवे...