मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केसरी हृदयस्पर्शी सिनेमा

केसरी एखाद्या युध्दाची, लढाईची किंवा एखाद्या रणसंग्रामाची गाथा ही त्या रणसंग्रामाच्या विजयश्री वर किंवा यशस्वीतेवर अवलंबून असते, अस मुळीच नाही. तर एकूणच त्या रणसंग्रामाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर देखील, त्या लढाईचा, युध्दाचा, रणसंग्रामाचा इतिहास ठरवला जात असतो. मूळात आपली भारतभुमी शौर्यलक्ष्मी, त्यागाचे प्रतिक असणाऱ्या मुत्सद्दी विद्वान सैनिकांची, पराक्रम गाजवणाऱ्या शहिद जवानांच्या रक्ताने माखलेली आहे.                   जेव्हा-जेव्हा आपण, जवानांच्या किंवा देशवासियांच्या गुलामगिरीचा इतिहास चाचपडत पाहयला लागतो किंवा वाचायला, अभ्यासायला लागतो तेव्हा, आपल्याला कुठे - ना - कूठे, अनेक कौतुकास्पद प्रासंगिक घटनांबद्दल लेखाजोखा मिळायला लागतो. आणि त्या लेखाजोख्याचा मागोवा आपण जेव्हा, घ्यायला लागतो. तेव्हा नक्कीच तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करणाऱ्या सत्यघटनेवर आधारलेल्या कथा सापडतील. त्याच धरतीवर आधारित एक कथा म्हणजे "केसरी" सिनेमा              ...