केसरी
![]() |
एखाद्या युध्दाची, लढाईची किंवा एखाद्या रणसंग्रामाची गाथा ही त्या रणसंग्रामाच्या विजयश्री वर किंवा यशस्वीतेवर अवलंबून असते, अस मुळीच नाही. तर एकूणच त्या रणसंग्रामाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर देखील, त्या लढाईचा, युध्दाचा, रणसंग्रामाचा इतिहास ठरवला जात असतो. मूळात आपली भारतभुमी शौर्यलक्ष्मी, त्यागाचे प्रतिक असणाऱ्या मुत्सद्दी विद्वान सैनिकांची, पराक्रम गाजवणाऱ्या शहिद जवानांच्या रक्ताने माखलेली आहे.
जेव्हा-जेव्हा आपण, जवानांच्या किंवा देशवासियांच्या गुलामगिरीचा इतिहास चाचपडत पाहयला लागतो किंवा वाचायला, अभ्यासायला लागतो तेव्हा, आपल्याला कुठे - ना - कूठे, अनेक कौतुकास्पद प्रासंगिक घटनांबद्दल लेखाजोखा मिळायला लागतो. आणि त्या लेखाजोख्याचा मागोवा आपण जेव्हा, घ्यायला लागतो. तेव्हा नक्कीच तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करणाऱ्या सत्यघटनेवर आधारलेल्या कथा सापडतील. त्याच धरतीवर आधारित एक कथा म्हणजे "केसरी" सिनेमा
या एका ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करत. दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी 19व्या शतकातील सारागढ़ी येथील एका गौरवशाली गाथेचा अर्थात ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली शिख रेजिमेंट मधील हवलदार इशर सिंह या प्रमुख जवानांची आणि इतर जवानांच्या बलिदानची गाथा केसरी सिनेमाच्या माध्यमातून मांडली आहे.
सारागढ़ी येथील 21 शिख जवानांनी ब्रिटिश सरकारच्या सैनिक रेजिमेंट मधून बाहेर पडत, गुलामगिरीच्या विरोधात अफगाणी मुस्लिमशाही विरोधात. हिंदुस्थानातील पुर्व शहिद जवानांच्या बलिदानची स्मरणिका लक्षात ठेवून लढलेली लढाई म्हणजे सारागढ़ीची लढाई. इ.स. १२ सप्टेंबर १८९७ रोजी झालेला हा मोठा हृदयस्पर्शी रणसंग्राम जेव्हा एखादा दिग्दर्शक. चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हा प्रयत्न किती प्रमाणात, यशस्वी ठरले याची खात्री किंवा गणितं, चित्रपट प्रेक्षकवर्गांच्या दृष्टीने किंवा एखाद्या तंत्रपध्दतीच्या, संकल्पनेच्या दृष्टीकोनातून आखणी करणे मुश्किल ठरायला लागते.
होय मी हे विधान केसरी चित्रपटाबद्दल माझ्या मतानुसार हे विधान करतोय कारण जेव्हा एखादी घटना इतिहासातील असते तेव्हा त्या घटनेचा संदर्भ किंवा त्या घटनेबाबतची कल्पना पुर्णवत आज पडद्यावर उतरवणे शक्य होत नाही. ही सत्यता तुम्हा आम्हा सर्वांना नाकारता येत नाही. चित्रपटगृहात सर्व प्रेक्षकांना तिन तास खेळवून ठेवणारा, केसरी हा एका ऐतिहासिक घटनेवर, रणसंग्रामावर आधारलेला चित्रपट. अनुराग सिंह दिग्दर्शित सिनेमा एका उत्तम दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न या नवखा दिग्दर्शकाने केला आहे अस म्हटलं तर वावगे ठरणार नाही. या चित्रपटात हवालदार इशर सिंह च्या मुख्यभुमिकेत अभिनेता म्हणून अक्षय कुमार आहे. त्या भुमिकेला योग्य रितीने वाव आणि सन्मान देण्याच काम अक्षयकुमार यांनी केले आहे अस जाणवत. एकंदरीत, अर्थपूर्ण, आशयपूर्ण कथानक लक्षात घेऊन भुमिका हाताळणी करण्याच काम आजवर अनेक चित्रपटातून अक्षयकुमार सारख्या उमद्या कलावंताच्या अभिनयातून आणि कामातून दिसून यायला लागत. भुमिकेपलिकडे जाऊन ही अभिनय क्षमता अंगी बाळगणारा कलावंत म्हणून अक्षयकुमार ची ओळख आज निर्माण झालेली आहे. या चित्रपटात हवालदार इशर सिंह या नायकाच्या पत्नीची भुमिका प्रणिती चोपरा हिने साकारली आहे. मुळात चित्रपटात प्रणिती चोप्रा हिने उठवलेल्या भुमिकेला पडद्यावर अत्यंत कमी वेळाच स्थान मिळालेल तुम्हाला दिसेल. मात्र त्या भुमिकेसाठी जेवढा काही वेळ मिळाला आहे. त्या चाकोरीत, छान पध्दतीने ती भुमिका प्रणिती चोप्रा हिने साजेशा प्रकारे निभावली आहे. अस म्हणता येईल. "36शिख रेजिमेंट" नावाची 21 जवानांची ही फळी ब्रिटिश सरकारसाठी काम करत असते. मात्र जेव्हा एखाद्या इशर सिंह सारख्या जवानांला, फौजीला, सैनिकाला. आपल्या गुलामीची जाणिव होते. तेव्हा तो जवान इतर जवानांना याची जाणीव करून देत. देशासाठी, पूर्व इतिहासातील शहिदांच्या बलिदानाची आठवण लक्षात घेऊन. त्याच्या आणि स्वतःच्या अस्मितेला जपत लाढायला लागतात. इ.स.१८९७ दशकाच्या हिंदुस्थानातील काही भागात सस्थांने खालसा झाल्यानंतर ही तिथे अफगाण लोक संस्थान निर्माण करण्यासाठी अफगाणचा एक धर्मवेडा काझी. जिहादच्या नावाखाली अफगाणच्या सेनापती ला युध्द लढण्यासाठी प्रयत्नशील बनवतो. आणि तेव्हाची ही लढाई. आपल्या देशातील जवान गोऱ्या लोकांसाठी,सालरी सोल्जर म्हणून काम करत असताना जेव्हा एक गोरा अधिकारी इशर सिंह ला म्हणतो की तुम्ही भारतीय आमच्या पायाखालील धूळ आहात. आणि हिंदुस्तानाच्या मातीतून भित्री लोक जन्माला येतात अशा स्वरूपातील वाक्य ऐकून. आपण ब्रिटिशांचे गुलाम आहोत, लाचारी पत्कारली आहे असं लक्षात आल्यानंतर.. शिख जवान स्वतःच्या सन्मानसाठी केशरी पगडी डोक्यावर बांधून. १० हजार अफगाण सैनिकांच्या विरूध्द २१ शिख जवान लढाई लढतात. साहजिकच त्या २१ जवानांची "३६ शिख रेजिमेंट" युध्दात शिरकाव करु शकणार नाही. मात्र जेव्हा स्वतःच्या भुमीसाठी रणांगणात उतरण्याचा निश्चय पक्का असतो. तेव्हा एका अर्थाने ती निम्मी लढाई शिख जवानांनी जिंकलेली असते. एकंदरीत चित्रपटाच्या माध्यमातून अनेक बारकाव्या सहित सर्वंच गोष्टींना हाताळण्याच काम केसरी सिनेमाच्या सर्व टिम ने केलेल तुम्हाला दिसून येईल. चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटा बदलच माझ मत शब्दातून व्यक्त करणे अवघड आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जवळपासच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला "केसरी" हा सिनेमा नक्कीच आवर्जून पहावा. आणि नवीन प्रेरणादायी उमेद घेऊन तुम्ही सर्वजण पुन्हा नव्याने उर्जाशाली पध्दतीने तुमच्या सुखी आयुष्यात नांदायला लागा हा आशावाद..
Must watch Kesari movie..
#सर_सलामत_तो_पगडी_पच्यास
#जो_बोले_सोनिहाल_सत्_श्रीयाकाल
✍️ © - अजय भुजबळ, परभणी
मो. नं. ८१८०९४१२५५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा