मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजी माय मला गोष्ट सांग ना...…! गॅझेट पलीकडं जगूया...!

आजी माय मला गोष्ट सांग ना...!  तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगायची का..?  किं वा तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगते का..? मुळात काळ जसा जसा बदलत जातोय तस तशी माणसंही बदलली जात आहेत. यात काहीच तिळमात्र शंका नाहीये..! तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगायची का..? किंवा तुमच्या आजी तुम्हाला आज गोष्ट सांगते का..? या प्रश्नाचे उत्तर ,काय आहे किंवा काय असेल आताच्या घडीला ; आज दिवसभर मला माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये डोकावून पाहण्यासाठी या प्रश्नाने भाग पाडले..! माझ्या जुन्या गोष्टींमध्ये भुरळ घातली. जुन्या स्मरणीय आठवणींचा - आठवणींना उजाळा मिळाला..! कारण आज आपण सर्वजण जेव्हा स्वतःला प्रतिष्ठित पुढारलेले समजायला लागतो, तेव्हा कुठे ना कुठे अशा काहीशा  घटना कारणीभूत ठरायला लागतात. की आपण व्यतीत केलेल्या पाठीमागच्या आयुष्यातील गोष्टीमधील दिवस , अविस्मरणीय गोष्टींचा मागोवा घ्यायला कुठलीतरी एक गोष्ट कारणीभूत ठरते. तसंच आज दिवसभरामध्ये चिमुरड्या पोरांचा गोंधळ निरागसपणा नजरेसमोर आला. आणि योगायोगाने अरेबिक कथाशी संबंधित सृजनमयसभा हे नाटक पाहायला मिळालं. त्यामुळे हा खटाटो...

" सामाजिक सदभावनेच भान जागृत ठेवणारा : म्होरक्या " The Leader ..!

काल, तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या यादीतील, म्होरक्या चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहून मला काय वाटलं, काय उमजलं हे तुमच्या समोर माझ्या Point Of View मधून मांडतोय..! फक्त दोन-तीन मिनिट देऊन हा लेख वाचा आणि आपलं मत जरूर कळवा..! आपण माणूस म्हणून, जगायला वावरायला शकतो. तेव्हा प्रत्येकात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या गोष्टीमध्ये, अथवा एखाद्या कामासाठी पुढाकार घेण्याचे,सामर्थ्य असत. तो पूढाकार घेणे म्हणजे लिडर,म्होरक्या होण्याची लक्षणे ; आणि नेमकं तेच काम नेटाने प्रागतिक मार्गाने पुर्णत्वास घेऊन जाणारा, मार्ग दाखवणारा व्यक्ती आणि    जो समोर राहून काम पाहतो, तो म्होरक्या .  प्रत्येकात एक  म्होरक्या दडलेला असतो. आपण लहानाचे मोठे होतो शाळेत जातो. शाळेत गेल्यावर त्या शाळेतील दिवसांमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट येते. एक संकल्पना येते, ती म्हणजे मॉनिटर, लीडर या नावाची. म्होरक्या चित्रपटाच्या अनुषंगाने मी लिहितो आहे. अर्थात मराठी चित्रपट विश्वात, बहुचर्चित दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त यादितील. म्होरक्या चित्रपटाच्या बाबतीत. खऱ्या ...