मुख्य सामग्रीवर वगळा

" सामाजिक सदभावनेच भान जागृत ठेवणारा : म्होरक्या " The Leader ..!

काल, तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या यादीतील, म्होरक्या चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहून मला काय वाटलं, काय उमजलं हे तुमच्या समोर माझ्या Point Of View मधून मांडतोय..! फक्त दोन-तीन मिनिट देऊन हा लेख वाचा आणि आपलं मत जरूर कळवा..!

आपण माणूस म्हणून, जगायला वावरायला शकतो. तेव्हा प्रत्येकात कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या गोष्टीमध्ये, अथवा एखाद्या कामासाठी पुढाकार घेण्याचे,सामर्थ्य असत. तो पूढाकार घेणे म्हणजे लिडर,म्होरक्या होण्याची लक्षणे ; आणि नेमकं तेच काम नेटाने प्रागतिक मार्गाने पुर्णत्वास घेऊन जाणारा, मार्ग दाखवणारा व्यक्ती आणि  जो समोर राहून काम पाहतो, तो म्होरक्याप्रत्येकात एक म्होरक्या दडलेला असतो.

आपण लहानाचे मोठे होतो शाळेत जातो. शाळेत गेल्यावर त्या शाळेतील दिवसांमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट येते. एक संकल्पना येते, ती म्हणजे मॉनिटर, लीडर या नावाची. म्होरक्या चित्रपटाच्या अनुषंगाने मी लिहितो आहे. अर्थात मराठी चित्रपट विश्वात, बहुचर्चित दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त यादितील. म्होरक्या चित्रपटाच्या बाबतीत. खऱ्या अर्थाने गेल्यावर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे पुरस्कार, जेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार अशी उद्घोषणा होते. 

            तेव्हा जवळपास सर्वच विजेत्यांनी या गोष्टीचा निषेध केला होता. काही मंडळींनी तर पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. अशी धमक दाखविणाऱ्यां पैकी, एका दिग्दर्शकाचं नाव अग्रगण्यपणे येत. ते म्हणजे 'अमर देवकर..!' पुढे अमर देवकर मोरक्या चित्रपट "१२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात" घेऊन जातात. थाटामाटात निवडक चित्रपटाच्या यादीत म्होरक्या चित्रपटाची स्क्रिनिंग होते. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याचा काळ मराठी चित्रपट आवडिने पाहणारा, प्रेक्षकवर्ग कमी झाला आहे.
(हे माझ वैयक्तिक पातळीवरील मत) आणि त्यातली त्यात गैरव्यवसायिक , राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग एकदम बोटावर मोजता येईल, एवढा तुरळक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतपतच दिसतो.

अशा परिस्थितीत हे सारे जुगारून, धूडकारत, त्या क्षेत्रात पदार्पण करणे. चित्रपट बनवताना आर्थिक अडचणींवर मात करत,स्वत:ह कडे असलेली शेती विकून. चित्रपट निर्माण करणे. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णकमळ पदक मिळवणे. हे एका ग्रामिण भागातील विशेषतः मराठवाड्याच्या सिमेरेषेवरील बार्शी सोलापूर सारख्या, ग्रामीण भागातील तरुणाने जिद्दीने साकारलेलं नवलाई आणि धाडसाचे ,कार्य म्हणाव लागेल..! तांत्रिकदृष्ट्या या चित्रपटाचा विषय किती तगडा आहे. हे मी सांगू शकत नाही. मात्र कथानक सर्वोत्तम आणि भन्नाट अप्रतिमच आहे.गणतंत्र मानणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट समर्पित आहे.

   गावगाड्यात राहणाऱ्या, गावकऱ्यांचे वास्तविक जगणं, जगण्यातला रांगडेबाजपणा, शेळ्याा-मेंढर, कुत्र, नदी, बारव, विहर, म्हैस, गुरढोरं, मंदीर, हे सारे सूत्र पकडून आगळगाव,बार्शी आणि इतर काही ठिकाणी चित्रण करत हा चित्रपट निर्माण झाला. गावगाड्यातील एका कुटुंबावर  जेव्हा कुटुंब प्रमुख गेल्याच संकट येते ,त्या कुटुंबाला कुटुंब प्रमुख आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर सोडून जातो.तेव्हा त्या कुटुंबाचे जगण्याचं रडगाणे बाजूला सारत, परिस्थितीवर मात करत जगण्याचा संघर्ष चालू असतो.
 मग अशोक सारखं पोर बापाची कमी बसायला लागल्यावर, आकांताने आरडू-ओरडू हुंदके फोडत स्वतःच्या माईला विचारायला लागतं ये माय म्हवा बाप कशान मेला ? आजे म्हवा बाप कशान मेला.? आजी सांगायला लागते, एड्स ने फाशी घेऊन मेला. एड्स का नाय निट  केला ..?  हा डोकं चक्रावून टाकणारा अशोकचा प्रश्न मार्मिकतेचे  दर्शन घडवून द्यायला लागतो.

 त्याच अशोकच्या बापाच्या डोक्यावरच्या कर्ज  फिटल्याले नसल्यामुळे अशोक नावाचं पोर गुराखी म्हणून गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाच्या घरी सालाने गुराखी म्हणून काम पाहतो. शाळेत हजेरीपटावर नाव असून सुद्धा परिस्थितीमुळं शाळेत न जाता येणे. जि.प्र.प्रा.शाळा आगळगाव,बार्शी अशोक ला मॅडम शाळेत पकडून,बोलून आणायला लावतात. योगायोगाने शाळेत होणाऱ्या गणतंत्र परेडसाठी ; त्याच्या आवाजामुळे अंगभूत,गुणांमुळे निवड होते. निवड झाल्यावर आपली संधी मुकते की काय या भीतीत टरेगिरी करणारा त्याचा वर्गमित्र आणि गावातील वरचढ मंडळींचा पोरगा सांगायला लागतो की अशोकला कुणी परेड शिकवणार नाही शिकवली तर खबरदार. 

  या परिस्थितीमध्ये अशोक च्या डोक्यात खुळ भरतं. मनात इच्छा निर्माण व्हायला लागतं. की आपण परेड करायची ; आणि लिडर व्हायचं. मग शोधाशोध सुरू होती की मला गावात कोणाकडून परेड शिकता येईल. म्हाताऱ्या गुराख्याला विचारपूस. गोमतेर आबा (रामचंद्र धूमाळ). सांगायला लागतात की माझा जन्म गणतंत्रता दिवशी झाला त्यामुळे माझं नाव गणतंत्र ठेवण्यात आले. आणि त्याचा अपभ्रंश गोमतेर आबा झाला... दिवसागणिक पायदळी वाट तुडवताना सतराशेसाठ काटे मोडतात पायांची चाळण होते. आबा ते माळरानावर राहणार.आन्या खरंच वेड आहे का उगिउगी करतय व्हय. येड येड कस होतय ..? येड्यालच माहीती आपण किती येड हायत ते शाहण्याला काय माहित..? 
येड येड नसतय,  येड शाहण्याला यड्यात काढत्यात ते निराळ.
'जास्त इचार केल्यावर.'  आणि अशोक ने स्वत:हच्या मेंढीला दिलेलं हिरोईन कटरिना नाव. आणि इतर प्रत्येक संवादातील मर्मभेद, मार्मिकता अप्रतिम पद्धतीने लेखकाने मांडण्याचं काम केलेलं दिसून येत आहे. 

   अमर देवकर यांनी साकारलेल्या दोन्ही भुमिका वाखाण्या जोग्या आहेत विषेश म्हणजे वेड्याची भुमिका..! गोंधळाच्या वातावरणातील सिन, मुंगळे इत्यादी कॅमेरा अँगल चित्रण तर फारच उत्तम रीतीने घेतले...‍! शिक्षकांचा, विद्यार्थी-विद्यार्थिनी , प्राजक्ता आणि इतर भूमिका,पात्र, त्यांच्यावर दिग्दर्शकांना घेतलेली मेहनत सार्थकी लावण्याच काम सर्व कलावंत मंडळींनी केलं असं म्हणायचं लागेल...!

         परिस्थितीपुढे लाचार. बुट घेण्याइतपत पैसे नाहीयेत. परेड शिकायची तरी इच्छा मात्र तीव्र..! शाळा शिकून कोणाचं भलं झालंय,असं बोलणारा  पक्का नेमबाजी करणारा त्याचा मित्र. परेड शिकतांची कसरत,सराव...! मुलाची आई मुकी असते त्याला आपली आई जात्यावर गाणं गाताना दिसावी ही स्वप्नवत अनुत्तरीत राहणार सत्य..! गावातील इतर पात्र, भूमिका. आणि चित्रपटाच्या शेवटाकडे चित्रपट सांगायला लागतो की प्रत्येक गोष्टींच्या वळणावरती राजकारण घडत किंवा घडवलं जातं.

 सामान्य गुराख्या माध्यमातून बोलत जाणारा, म्होरक्या. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, परिस्थितीची जाणीव. लीडर म्होरक्या सर्वांना सोबत,घेऊन चालायला लागतो..! अधिकार गाजवत नसतो... वगैरे वगैरे..! एकंदरीत समाजाचे अंतर्मन आणि समाज भान जागृत करणारी ही कलाकृती आहे. चित्रपट निर्मिती मध्ये असलेली सर्व टीम अमर देवकर,अभय चव्हाण ,रामचंद्र धुमाळ, उमेश मालन , अनिल कांबळे, अगदी सर्वांचे अभिनंदन... आणि तुम्हा सर्वांना सांगतो. आपण सर्व प्रेक्षक म्हणून आणि गणतंत्र मानणारे एक सुजाण नागरिक म्हणून हा चित्रपट आवर्जून सर्वांनी पहावाच एवढीच माफक अपेक्षा..! आणि नक्कीच तुम्हा सर्वांच्या पसंतीस उतरले असा हा चित्रपट आहे.! आम्ही सर्व जण साहाय्यक म्हणून अमर सर आणि टीम म्होरक्याचा भाग समजतो स्वत:ला आज कैक ठिकाणी म्होरक्या चित्रपटचे शो‌ लागले नाहीत ते नक्कीच सर्वत्र लागतील... आपण फक्त मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे..!

पाच स्टार ...पैकिच्या पैकी.⭐⭐⭐⭐⭐

✍️ अजय भुजबळ, परभणी, (औरंगाबाद मराठवाडा)
मो.नं:- 8180941255 / 9404910594

टिप्पण्या

  1. लेख सुंदर लिहिला आहे आणि चित्रपट तर अप्रतिमच आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. हा चित्रपट अप्रतिम आहेच. पण चित्रपटाचे नवा खूप भारी आहे...

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. म्होरक्या म्हणजे अभावातून प्रभाव दाखविणारा अतिशय नितांतसुंदर चित्रपट. सर्वांनी आवर्जून पहायला हवा.

      हटवा
  4. प्रत्युत्तरे

    1. धन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!

      हटवा
  5. अप्रतिम लिखाण .....धावत्या जगात कानाडोळा होत असलेल्या मराठी चित्रपटाकडे मराठी माणसाचं मन वळाव अस सुंदर लिखाण आपण केलंय....आणि चित्रपट हा खराखुरा ग्रामीण जीवन आणि ग्रामीण जिद्द दाखवून देणार आहे हेच यावरून लक्षात येत...

    उत्तर द्याहटवा
  6. प्रत्युत्तरे

    1. धन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!

      हटवा
  7. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!

      हटवा
  8. खूप छान लेखन आहे सर...अमर सर thank you या चित्रपटातून आम्हाला खूप काही शिकण्यासाठी मिळालं आणि प्रत्येकात एक म्होरक्या दडून असतो फक्त ते आपल्याला धैर्याने उजेडात आणायला पाहिजे हे या चित्रपटातून स्पष्टपणे कळून येत...। खरच येड शहाणा असतो सगळ्यांना येड्यात काढत असतो वा सर एकच नंबर.......!

    उत्तर द्याहटवा
  9. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!

      हटवा
  10. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!

      हटवा
  11. खूप छान प्रकारे चित्रपटाचं विश्लेषण केलंय तू अजय चित्रपट पाहायला खूप आवडेल😊😊

    उत्तर द्याहटवा
  12. धन्यवाद..! वरती तुमचं नाव येतं नसल्याने ही प्रतिक्रिया अनोळखी या दर्शवते आहे..!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...