मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Maratha Reservation : मराठा व कुणबी एकच ; केवळ मराठा ही स्वतंत्रपणे वेगळी जात नाही....

मुळात आज तागायत महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा वर्षानुवर्षे चालू आहे. आणि या लढ्याला ऐतिहासिक घटनांचा आधारभूत असा इतिहास आणि पुरावे देखील आहेत. १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत अर्थात निजाम राजवट संपुष्टात येई (मराठवाडा मुक्ती संग्राम) पर्यंत मराठ्यांना कुणबी मानले जायचे आणि ते ओबीसी होते. जे शेती करतात ते कुणबी आणि आज देखील प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मराठा समाज प्रमुख व्यवसाय म्हणून शेती काम करतात. ३२ वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा लढा माथाडी कामगार संघटनेचे नेते आण्णासाहेब पाटील यांनी दिला होता. तेव्हा पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा इथल्या राजकारणाचा भाग बनला आहे. आणि मराठा आरक्षणासाठी झालेली आंदोलने आणि एकंदरीत या लढ्या साठी आजतागायत ७०-७५ मराठा समाज बांधवानी आपल्या जीवाचे बलिदान दिलॆ आहे. ते बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून जालना आंतरवाली सराटी येथील गोदा काठच्या मनोज जरांगे पाटील यांनी मागणी लावून धरलेली आहे की सर्व मराठा बांधवाना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या संदर्भातील हा पत्रकार अजय भुजबळ यांचा विश्लेषणात्मक लेख .....  विश्लेषणात्मक लेख...