मुळात आज तागायत महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा वर्षानुवर्षे चालू आहे. आणि या लढ्याला ऐतिहासिक घटनांचा आधारभूत असा इतिहास आणि पुरावे देखील आहेत. १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत अर्थात निजाम राजवट संपुष्टात येई (मराठवाडा मुक्ती संग्राम) पर्यंत मराठ्यांना कुणबी मानले जायचे आणि ते ओबीसी होते. जे शेती करतात ते कुणबी आणि आज देखील प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मराठा समाज प्रमुख व्यवसाय म्हणून शेती काम करतात. ३२ वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा लढा माथाडी कामगार संघटनेचे नेते आण्णासाहेब पाटील यांनी दिला होता. तेव्हा पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा इथल्या राजकारणाचा भाग बनला आहे. आणि मराठा आरक्षणासाठी झालेली आंदोलने आणि एकंदरीत या लढ्या साठी आजतागायत ७०-७५ मराठा समाज बांधवानी आपल्या जीवाचे बलिदान दिलॆ आहे. ते बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून जालना आंतरवाली सराटी येथील गोदा काठच्या मनोज जरांगे पाटील यांनी मागणी लावून धरलेली आहे की सर्व मराठा बांधवाना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या संदर्भातील हा पत्रकार अजय भुजबळ यांचा विश्लेषणात्मक लेख.....
विश्लेषणात्मक लेख
मराठा व कुणबी, मराठा या जातीच्या पोटजातीचा २००४ मधील शासन निर्णय : "जो सांगतो को मराठा आणि कुणबी मराठा हि एकच जात आहे. केवळ मराठा ही जात नाही"
मराठा व कुणबी एक असून ते एकाच समाजातील आहेत. कुणबी समाजाला यापूर्वीच इतर मागास प्रवर्गामध्ये (ओबीसी) समाविष्ट करण्यात आले आहे. त्याआधारे मराठा समाजालाही यापूर्वीच ओबीसीमध्ये समाविष्ट करायला हवे होते, असे मागास प्रवर्ग आयोगाने अहवालात नमूद केले आहे.मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागास आहे की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आठ सदस्यीय समिती नेमली. समितीने नोव्हेंबर २०१८ मध्ये मराठा समाजाबद्दलचा अहवाल राज्य सरकारपुढे सादर केला. या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला व तसा कायदा मंजूर करण्यात आला होता. या कायद्याच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवारच्या सुनावणीत न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना व सर्व प्रतिवाद्यांना अहवालाची सीडी देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार सरकारने मंगळवारी सर्व याचिकाकर्ते प्रतिवाद्यांना अहवालाची सीडी दिली. एप्रिल १९४२ मध्ये तत्कालीन बॉम्बे गव्हर्मेंटने शासन निर्णय जारी करून मागास प्रवर्गाची यादी जाहीर केली होती. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. १९४२ मध्येच मराठा समाजाला केवळ शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळाले होते. मात्र, १९५० मध्ये केंद्र सरकारने ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची यादी जाहीर केली.
त्यात मराठा समाजाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर १९६६ मध्ये राज्य सरकारने या यादीत सुधारणा करत ओबीसीमध्ये कुणबी समाजाला समाविष्ट केले,’ असे अहवालात म्हटले आहे.मराठा व कुणबी एकाच जातीचे असून हे दोन समाज भिन्न नाहीत, या मतावर आयोग ठाम आहे. मराठा आणि कुणबी एक असल्याने व कुणबी समाजाला यापूर्वीच ओबीसीत समाविष्ट केल्याने मराठा समाजालाही यापूर्वीच ओबीसीत समाविष्ट करायला हवे होते, असेही मत आयोगाने मांडले.मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकरीत्या मागासलेला असल्याने त्यांचा समावेश
ओबीसीमध्ये करण्यात यावा, अशी शिफारस करताना आयोगाने शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाजातील शेतक-यांची आकडेवारीही अहवालात नमूद केली आहे. जिल्हाधिकारी व आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार, आत्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये मराठा समाजातील शेतक-यांचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१८ या कालावधील १३,३६८ मराठा समाजातील शेतक-यांनी आत्महत्या केली. हे प्रमाण २३.५६ टक्के इतके आहे. या आकडेवारीवरून मराठा समाजात असलेले वैफल्य दिसून येते. आपला कोणी आदर करत नाही, किंवा आरक्षणाच्या अभावा मुळे मराठा समाज उन्नत राहण्या ऐवजी मराठा समाज मागासते कडे वाटचाल करत आहे.
अशी भावना या समाजात आहे.
महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागार संचालनालयाचा हवाला देत आयोगाने अहवालात म्हटले आहे की, मराठा ही एक जात नसून मराठी बोलणा-या लोकांना ‘मराठा’ असे संबोधण्यात येते. हे लोक मुळात कुणबी असून ते शेती करायचे. अन्य जातींपेक्षा मराठा समाजातील लोक शेतकी व्यवसायात अधिक आहेत. शेतकी व्यवसाय करणारे मराठा समाजातील लोक आणि अन्य जातीचे लोक नैसर्गिक आपत्तींचे पीडित आहेत. मात्र, अन्य जातीतील लोकांचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजही त्याला अपवाद असू नये,’ असे आयोगाने अहवालात म्हटले आहे.
९६ कुळी ते महाराष्ट्रातील सगळे मराठे कुणबी आहेत का.?
ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या 'द ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया' या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे.
"मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही," असं या पुस्तकात म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महारजांनी उभारलेले
स्वराज हे - शांततेच्या काळात शेतात नांगर घेऊन राबणाऱ्या आणि युद्धकाळात लढाईस जाणाऱ्या कुणबी शेतकऱ्यांच्या साथीने महाराजांनी स्वराज उभारले.
संत तुकाराम महाराजांच्या 'बरें देवा कुणबी केलों, नाही तरि दंभे असतो मेलो' या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलं आहे.
छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं, "मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, कुणब्यांचा शेतकी एकच, असे आम्ही वर म्हणालो. यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यात राहणारे हे सिद्ध होते. पण या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की, धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पिणें केवळ अशक्य झाले आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिसऱ्याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतकऱ्याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे."
1960 च्या दशकात पंजाबराव देशमुख - यांनी
मराठा शेतकरी, मराठा कुणबी आहे अश्या स्वरूपाची मांडणी करत विदर्भातील मराठ्यांना घटनात्मक रित्या कुणबी म्हणून मान्यता प्राप्त करून घेतली. त्यावेळी विदर्भातल्या मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मात्र तेव्हा मराठवाड्यातील मराठ्यांनी आम्ही जमीनदार मराठे आहोत म्हणून कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नाकारले. आज जेव्हा विदर्भातील पुर्वाश्रमी मराठा समाजाची तिसरी चौथी पिढी लाभ घेत आहे तेव्हा आज ४० वर्षांनंतर मराठवाड्यातील मराठ्यांना या गोष्टीचा पश्चाताप किंवा सामाजिक रित्या मागासल्याची झळ मराठवाड्यातील मराठ्यांना बसत आहे. तेव्हा हि चूक सुधारावी म्हणून आज मरठवड्यातील आणि उर्वरित मराठा समाज जो कुणबी प्रवगात येत नाही तो आपल्या हक्क मागण्या साठी रस्त्यावर उत्तरला आहे.
संपूर्ण "मऱ्हाठा" हि एकच जात आहे. जर मराठा हा जातींचा समूह आहे असं म्हटल्या नंतर इतर कोणत्या जाती मराठा समूह जाती अंतर्गत येतात हे स्पष्ट करणे अपरिहार्य ठरते आणि ते स्पष्ट करणे अश्यक्यप्राय आहे. आणि यांचा परंपरागत एकच व्यवसाय तो म्हणजे शेती. या वरून लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे. महाराष्ट्रात ज्या ज्या विभागा अंतर्गत कुणबी, लेवा पाटील, पाटीलदार, देशमुख, ९६ कुळी इत्यादी तर उपाधी म्हणावी लागतील.
जागतिक इतिहास आणि विशेषता महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहास अभ्यासक पानीपतकार, अशी ज्यांची ओळख आहे ती विश्वास पाटील यांनी ब्रिटिशकालीन जातीनिहाय जनगणना व्यवसाय निहाय धर्मनिहाय नोंदींचा आधार घेत एक अभ्यासपूर्वक मांडणी केली आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत त्या अभ्यासाचा दुवा म्हणून मी इथे त्यांची व्हिडिओ आणि पोस्ट संलग्न करत आहे ते तुम्ही पाहू शकता-
न्युज 18 लोकमत मुलाखत -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा