आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस! २६ जून १८७४ रोजी कागल येथे जन्मलेल्या या युगपुरुषाने केवळ कोल्हापूर संस्थानाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक जीवनात क्रांती घडवून आणली. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे, ही खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचा जागर करणे होय. त्या निमित्ताने युवा व्याख्याते अजय भुजबळ परभणीकर यांनी लिहिलेला ऐतिहासिक लेख छत्रपती राजर्षी शाहू महाराज: सामाजिक समतेचे अग्रदूत आणि वैचारिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक दूरदृष्टीचे समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. त्यांचे जीवनकार्य हे जातीय भेदभावाविरुद्ध आणि अस्पृश्यतेविरुद्ध चालवलेल्या अथक संघर्षाचे प्रतीक आहे. सामाजिक समतेची चळवळ: शाहू महाराजांनी समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी अनेक धाडसी पावले उचलली. त्यांनी जातीय भेदभावाला मूठमाती देण्यासाठी अथक प्रयत्न केले. १९०२ साली त्यांनी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय...
नमस्कार मित्रांनो..! तुम्हा सर्वांचे या ब्लॉग पेज वर आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. आपणास या ब्लॉग वर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,कला, क्रिडा,प्रवास, विश्लेषण, चालू घडामोडी आणि ज्ञानवर्धक गोष्टींबाबत वाचायला मिळेल..! तर सबस्क्राईब करा फॉलोअप घेत रहा..!भेटत रहा या आधुनिक तंत्रज्ञानाचा गावात..! "Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी" आपल्या माहिती साठी लिंक : https://vatsaruofwords.blogspot.com/