शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: माती, खडी रॉयल्टी फ्री! Written by : © Ajay Bhujbal परिवर्तन एक शोध टीम / मुंबई Published: April 5, 2025 10:10 AM (IST) मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, घरकूल बांधण्यासाठी, शेतकऱ्यांना स्वतःची विहीर किंवा शेततळे बांधण्यासाठी, तसेच 'मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजने'अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी लागणारे गौण खनिज (माती, मुरुम, दगड, मातीयुक्त रेती) आता रॉयल्टीमुक्त मिळणार आहे. महसूल व वन विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी (शासन निर्णयात नमूद तारीख) याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, विविध शासकीय योजनांतर्गत किंवा पूरहानी टाळण्यासाठी होणाऱ्या गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव (मामा तलाव), आणि लघुसिंचन तलाव (M.I. Tank) यांच्या खोलीकरण किंवा सरळीकरणातून निघणारे गौण खनिज रॉयल्टीशिवाय वापरता येणार आहे. या नि...
नमस्कार मित्रांनो..! तुम्हा सर्वांचे या ब्लॉग पेज वर आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. आपणास या ब्लॉग वर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,कला, क्रिडा,प्रवास, विश्लेषण, चालू घडामोडी आणि ज्ञानवर्धक गोष्टींबाबत वाचायला मिळेल..! तर सबस्क्राईब करा फॉलोअप घेत रहा..!भेटत रहा या आधुनिक तंत्रज्ञानाचा गावात..! "Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी" आपल्या माहिती साठी लिंक : https://vatsaruofwords.blogspot.com/