#जागतिक_क्षयरोग_दिन #विशेष_लेख
"चिंता नाही, तर काळजी घेऊया. क्षयरोग हद्दपार करूया...!"
सावधान रस्त्यावर थुंकताय? टीबी होऊ शकतो...! थोडक्यात शिंकणे, खोकणे, थुंकणे या मार्गाने क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात. क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग एके काळी हा दुर्धर समजला
रोग आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. या आजारावर उपचार पध्दती अस्तित्वात आहेत आणि विकसित झालेल्या आहेत म्हणून आपण या आजारा बद्दल हलगर्जीपणा राखणे महाग पडू शकते. चला तर माहिती करून घेऊया जागतिक क्षयरोग दिनानिमित्त काय खबरदारी पाळायला हवी. आणि या रोगरातून कायमस्वरूपी मुक्तता घेण्यासाठी काय करावे हवे..? जागतिक टीबी दिन जगभर बुधवार दि. २४ मार्च, आज रोजी पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने टीबीचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त होताना टीबीच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याची अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्या संदर्भात छातीरोग तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले जात आहे . 'रस्त्यावर थुंकल्याने टीबीचे जंतू हवेत तरंगतात. सुमारे ५ ते ७ दिवस हवेत तरंगत राहतात. त्या दरम्यान हे जंतू हवेतून श्वासाद्वारे फुफ्फुसात जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे टीबी होऊ शकतो. सध्या टीबी होण्याची विविध कारणे असली तरी रस्त्यावर थुंकल्याने त्यातून टीबीचा प्रसार होण्याचे कारण महत्त्वाचे मानले जात आहे. केस आणि मज्जातंतू हे दोन भाग वगळता शरीराच्या विविध भागांत मध्ये टीबीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. फुफ्फुस वगळता अन्य भागांमध्ये झालेल्या टीबीच्या प्रकाराला 'एक्स्ट्रा पल्मनरी टीबी' असे म्हणतात. तर, फुफ्फुसाच्या टीबी प्रकाराला 'पल्मनरी टीबी' असे म्हटले जाते. रस्त्यावर थुंकल्याने होणाऱ्या टीबीचे प्रकार वाढत असून, त्याचे प्रमाण किती आहे हे सांगणे सध्या अशक्यप्राय गोष्ट आहे. या कारणामुळे सर मात्रकारकडून अनेक दा रस्त्यावर थुंकू नका या शुलक गोष्टी वर मोठ्याप्रमाणात जाहिरात खर्च केला जातो. तरी सुद्धा लोक सार्वजनिक ठिकाणी थुकांयची अपायजन्य कृत्य करताना मागे सरकतांना दिसत नाहीत. 'रस्त्यावर थुंकल्यामुळे टीबीच्या जंतूचा संसर्ग वाहनचालकांना अथवा स्वच्छता कामगारांना होऊ शकतो. एका टीबी रुग्णामुळे १० जणांना संसर्ग होतो. प्रत्येकाला संसर्गामुळे टीबी होतोच असे नाही. पण त्यातील एकाला संसर्ग होऊन टीबी होऊ शकतो. त्यातील नऊ जण बरे होतात. खोकल्यासह थुंकीतून बाहेर पडणाऱ्या जंतूचे प्रमाण अधिक असते. रस्त्यावर थुंकल्याने टीबी होण्याचे प्रमाण अधिक असले तरी त्याकडे आपण सर्वजण दुर्लक्ष करतो. त्यामुळे रस्त्यावर थुंकणे थांबविले पाहिजे. सध्या उपलब्ध तंत्रज्ञानासह निदानाच्या पद्धतीमुळे, जनजागृतीमुळे टीबीचे निदान होत आहे. जनजागृती बरोबर सर्वसामान्य जनते मध्ये या गोष्टी बाबत आत्मिक जागृती आणि सामंजस्यपूर्णवक समज येणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते.क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पंरतू शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात आणि क्षय होण्याचे प्रमाण अधिक बळवतांना दिसून येऊ शकते. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. रस्त्यावर थुंकल्यास सहा महिन्यांपर्यंत टीबीचे जंतू मातीत जिवंत राहू शकतात. छातीत टीबी असल्यास त्याची थुंकी पॉझिटिव्ह येते. त्यामुळे टीबीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. रस्त्यावर छातीतील टीबीचा जंतू अनेकदा जिवंत राहतो. त्यामुळे त्याचा प्रसार होतो. टि. बी. चे लक्षणे :-दोन आठवडय़ांहून अधिक काळ, बेडकायुक्त खोकला (१५दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा ) हलकासा परंतु रात्री येणारा ताप, घटणारे वजन, भूक कमी होणे, बेडक्यातून रक्त पडणे, थकवा, छातीत दुखणे, रात्री येणारा घाम, मानेला गाठी येणे.टीबी रोखण्यासाठी उपाय - नव्या टीबी रुग्णाने जीन एक्स्पर्ट चाचणी करावी. त्यातून टीबीचे जंतू औषधांना प्रतिरोग करतात की नाही हेही निदान होते. खोकला आल्यास तोंडावर रुमाल ठेवावा.घरात टीबीचा रुग्ण असल्यास घर दररोज स्वच्छ करावे. त्याचा इतरांना संसर्ग होण्याची भीती.बाहेर, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये.देशभरातील टीबी रुग्णांचे प्रमाण जगाच्या तुलनेत सुमारे एक चतुर्थांश आहे. त्यामुळे टि. बी लक्षणे आढळून आल्यास पुर्ण उपचार करावा. अनेकदा टीबीचे उपचार घेऊन आजार बरा झाल्याचे वाटल्यास औषधे घेणे बंद केले जाते. त्यामुळे एमडीआर, एक्सडीआर टीबी वाढत आहे. नागरिकांनी टीबी झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. औषधोपचार पूर्ण करावीत. त्यामुळे टीबीला रोखता येणे शक्य आहे. "आधी दाढी मंजूर नहीं तो आधा इलाज क्यो..? " अश्या आशयाची अमिताभ बच्चन यांची जाहिरात आपण सर्वांनी पाहिली असेलच. त्यामुळे टी. बी. वर पूर्ण इलाज आणि पूर्ण कटिबध्दता राखत दक्ष दाहणे गरजेचे आहे. तर चला संकल्प करूया दक्षता बाळगूया आणि टी. बी. चा नायनाट करूया...! या जागतिक क्षय दिनानिमित्ताने..!
✍️© - अजय मारोतराव भुजबळ
मो. नं. 8180941255
👌👌👌
उत्तर द्याहटवा