परभणीत काळी गुढी परभणीत शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारला दिला इशारा परभणी: राज्य आणि केंद्र सरकारच्या शेती व शेतकरीविरोधी धोरणांविरोधात रविवारी (३० मार्च) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळी गुढी उभारून निषेध व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने १०० दिवसांत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभावापेक्षा १०% जास्त भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चार महिने उलटूनही कर्जमुक्ती झाली नाही आणि नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत पीक कर्ज भरण्यास सांगितले. यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या आंदोलनात किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजा लोडे, आदिनाथ लवंदे, प्रसाद गरुड, माउली शिंदे, सुदाम ढगे, उद्धव जवंजाळ, विकास भोपळे, पिना पाटील, सुधाकर खटिंग, रणजित चव्हाण, हनुमान अमाले, सय्यद कलीम, नामदेव काळे आदी सहभागी होते. यावेळी बोलताना किशोर ढगे म्हणाले , "राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत विश्वासघात करत आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही आणि आता पीक कर्ज भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये...
नमस्कार मित्रांनो..! तुम्हा सर्वांचे या ब्लॉग पेज वर आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. आपणास या ब्लॉग वर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,कला, क्रिडा,प्रवास, विश्लेषण, चालू घडामोडी आणि ज्ञानवर्धक गोष्टींबाबत वाचायला मिळेल..! तर सबस्क्राईब करा फॉलोअप घेत रहा..!भेटत रहा या आधुनिक तंत्रज्ञानाचा गावात..! "Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी" आपल्या माहिती साठी लिंक : https://vatsaruofwords.blogspot.com/