रोहित शर्माने आई-वडिलांचा केला सन्मान! शरद पवारांनी उलगडले वानखेडे स्टेडियमचे ऐतिहासिक क्षण आणि भारतीय क्रिकेटवीरांचा गौरव!
परिवर्तन एक शोध टीम / मुंबई/ प्रतिनिधी;
Written by : © Ajay Bhujbal
Published: May 17, 2025 09:10 AM (IST)
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात एका हृदयस्पर्शी क्षणाची नोंद झाली, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या आई-वडिलांना स्टेजवर आमंत्रित करून त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला. त्याने भरलेल्या मंडपात आई-वडिलांना वाकून नमस्कार करत उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यात माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीपासूनचा इतिहास उलगडला. क्रीडा मंत्री असताना स्टेडियमसाठी जागा मिळवण्यापासून ते त्याच्या उभारणीतील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी स्टेडियमच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मुंबईतील उद्योग समूहांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या योगदानाचा गौरव केला. विजय मर्चंट, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांसारख्या खेळाडूंच्या नावांचे स्टँड उभारण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाचा स्टँड उभारण्याच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. रोहितने आपल्या कर्तृत्वाने आणि खेळामुळे क्रिकेट रसिकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे, असे ते म्हणाले.
आगामी काळात वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संग्रहालय आणि क्रिकेट वस्तूंचे दुकान सुरू करण्याची योजनाही शरद पवार यांनी यावेळी सांगितली. यामुळे क्रिकेटप्रेमींना स्टेडियम आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची अधिक माहिती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात शरद पवार यांच्या नावाचा स्टँड उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले, मात्र प्रशासकीय योगदानाचा सन्मान म्हणून एमसीएने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. एमसीए आणि क्रिकेटप्रेमींच्या ऋणाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि या संस्थेसाठी नेहमी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.
A proud moment as Rohit Sharma was felicitated by Hon. Chief Minister of Maharashtra Shri. Devendra Fadnavis & Shri. Sharad Pawar at the MCA Stand Naming Ceremony 🙌🏽
Joined by MCA President Mr. Ajinkya Naik, Vice President Mr. Sanjay Naik, Secretary Mr. Abhay Hadap, Jt Secretary… pic.twitter.com/VgyCvYabkJ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा