आजी माय मला गोष्ट सांग ना...!
तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगायची का..?
किंवा
तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगते का..?
मुळात काळ जसा जसा बदलत जातोय तस तशी माणसंही बदलली जात आहेत. यात काहीच तिळमात्र शंका नाहीये..!
तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगायची का..? किंवा तुमच्या आजी तुम्हाला आज गोष्ट सांगते का..? या प्रश्नाचे उत्तर ,काय आहे किंवा काय असेल आताच्या घडीला ; आज दिवसभर मला माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये डोकावून पाहण्यासाठी या प्रश्नाने भाग पाडले..! माझ्या जुन्या गोष्टींमध्ये भुरळ घातली. जुन्या स्मरणीय आठवणींचा - आठवणींना उजाळा मिळाला..!
कारण आज आपण सर्वजण जेव्हा स्वतःला प्रतिष्ठित पुढारलेले समजायला लागतो, तेव्हा कुठे ना कुठे अशा काहीशा घटना कारणीभूत ठरायला लागतात. की आपण व्यतीत केलेल्या पाठीमागच्या आयुष्यातील गोष्टीमधील दिवस , अविस्मरणीय गोष्टींचा मागोवा घ्यायला कुठलीतरी एक गोष्ट कारणीभूत ठरते. तसंच आज दिवसभरामध्ये चिमुरड्या पोरांचा गोंधळ निरागसपणा नजरेसमोर आला. आणि योगायोगाने अरेबिक कथाशी संबंधित सृजनमयसभा हे नाटक पाहायला मिळालं. त्यामुळे हा खटाटोप माझ्या लेखणीतून,आर्टिकल मधून आज तुमच्या समोर मांडतोय. ज्यांना पचेल रुचेल ते वाचतील आवडीने. आपण देखील वाचा नक्कीच आवडेल. कारण हे सारं मनातून लिहितोय. कागदावर उतरवतो. आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा..!
चिमुरड्या पोरांचा निरागसपणा आणि निस्वार्थीपणे जगणं, नेहमीच मला आवडते. लहान मुले ही देवाघरची फुले असतात हे साने गुरुजींचे वाक्य सुद्धा तितकेच आजच्या काळात सुद्धा समर्पक वाटायला लागतात.. पूर्वी जेवढ तुलनेनं बालसाहित्य, बालकथा , बडबडगीते, लोककथा, ह्या सगळ्या गोष्टी चालीरितीतून, परंपरेतून, वेळ मिळेल तेव्हा वेळोवेळी, लिहिल्या जायच्या, सांगितल्या जायच्या. त्या सार्या गोष्टी तेवढ्या प्रमाणात लिहिल्या, वाचल्या, ऐकल्या, ऐकवल्या, सांगितल्या, जातात का..? तर याचं सकारात्मक उत्तर फारच मोजक्या प्रमाणात, थोडक्याच प्रमाणात तुम्हाला;आम्हाला मिळेल..!
या सद्यस्थितीला माता पिता , बालसंस्कार केंद्र, आणि बालवाड्या अंगणवाडी, मुलांच्या शाळा या गोष्टीकडे लक्ष देत आहेत का..? काहीच उत्तर मत वेगळे असू शकेल याबबतीत..! मात्र खर्या अर्थाने दंतकथा , अलीबाबा चालीस चोर, पंचमी कथा, जंगल सफर, अकबर बिरबल कथा, अरेबिक कथा, उर्दू कथा, बाल कथेच्या अंगाने, या सार्या गोष्टी या साहित्य प्रकारात मोडतात. त्या सार्या गोष्टी पूर्वी आम्हाला आजीकडून ज्येष्ठ लोकांकडून , किमान हट्ट केल्यानंतर का होईना , ऐकायला, पाहायला, वाचायला मिळायच्या.. मात्र आज ती परिस्थिती राहिली आहे का..? मला सुद्धा माझा बालपणीचा काळ आठवतो. तेव्हा मी माझ्या आजीला हट्ट करायचो मला एक तरी कहाणी सांग आजी माय..! या साऱ्या गोष्टी आठवल्या की मी क्षणार्धात पुरता का होईना त्या गोष्टींमध्ये रममाण व्हायला लागतो..! तू काय खरंच फार निरागस आणि निराळाच होता...
" बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " ह्या तुकोबारायांच्या अभंगवाणी मधील ओळी ; आज 21 व्या शतकात आधुनिक काळात वावरत असताना किती महत्त्वाच्या आणि खऱ्या आहेत ...बघा ना...! पूर्वी आपण सारेजण, आपापल्या आजी-आजोबांकडे हट्ट करायचो की आम्हाला एकतरी कथा सांगा ना..! किमान तेव्हा त्या गोष्टीत काही तथ्य असो व नसो..! मात्र गोष्ट ऐकण्याची हौस, आमची वृत्ती, त्यातून वृद्धिंगत होणारी श्रवणक्षमता..! आज बर्यापैकी आमची राहणीमान बदली..! या साऱ्या गोष्टींमुळे पूर्वीच्या जुन्या गोष्टी लोकपावत जातात की काय..? हा सतत भीतिदायक प्रश्न पडायला लागतो..! मी माझ्या बालपणी आजी-आजोबांना , रात्रीच्या जेवणानंतर झोपण्या अगोदर मोकळ्या चांदण्यात, चांद रातीला फक्त करायचं की मला एखादी गोष्ट सांगा एखादी कहाणी सांगा. एक तरी कहाणी ऐकल्याशिवाय मी झोपायचोच नाही..! तुम्हीसुद्धा वागलेले असाल ना असंच..? मग दिवसेंदिवस भरमसाठ कहाण्या कथा ऐकायला मिळायच्या. नंतर मझ्या बालमनाला प्रश्न पडायचा ऐवढ्या नवनवीन कथा, काहण्या यांना कशाबरं माहिती असतील..? कित्येकदा त्यांना विचारायचो देखील , मग उत्तर मिळायचं आम्ही पण आमच्या आजी आजोबांकडून म्हणजे तुझ्या परदादांकडून ही सारी शिदोरी मिळकत हासिल केलेली आहे...! अशा अनेक लोक परंपरेने चालत आलेल्या , लोककथा पिढीनी पिढीदर सांगण्याच्या ओघात बदलत जातात .. मात्र सार बोध शिकवण बदलत नाही..! आज समाजामध्ये लोक कथेतून दिल्या जाणाऱ्या शिकवणी बंद पडताना दिसत आहेत...! पिढी दर पिढी हे चित्र बदलत आहे..! विचार करून बघा..!
माझी आजी ज्यांना मी मोठ्या आई अशा नावाने हाक मारतो. त्यांनीसुद्धा मला बकळ भरपूर कथा सांगितलेल्या आहेत. अलीबाबा चालीस चोर , ज्या कथेत 40 चोर असतात. अलीबाबा असतो. अली बाबा ची बायको, मर्जिना, तिळा तिळा दार उघड, खुल जा सिम सिम, हे सार सांगत माणसांमध्ये लोभ लालचीपणा असू नये..! तेव्हा आपल्याला समजायचे..! परिकथा राक्षस कथा, बुरी नजर, सिंह ससा, "वाईट कर्म वाईट फळ...!" आजच्या पिढीला हे मिळत आहे का..? तर बरेचदा नकारात्मक उत्तर मिळेल..! हट्ट पुरवणारी कृषी पालक मंडळी शिल्लक नाही येत की काय..? फक्त धरणारी बालकं चिमुरडी मुलं शिल्लक नाहीत..? तर उत्तर आहे आम्ही वस्तूंच्या आहारी गेलोय..! गॅझेट प्रिय समाज विकसित होतोय..! माणुसकी संवेदनशीलता प्रेम आपुलकी या भावनांचे स्वरूप बदलवतो आहे..! चला गॅजेट च्या पलीकडे जाऊन लहान मुलांचा विचार करूया..! भावनाप्रधान संस्कृतीला पुन्हा समृद्ध करूया जतन करूया..! आणि आज पासून लहान मुलांना प्रेरणादायी कविता,कथा, महापूरूषांचा इतिहास, मानवतावादी दृष्टिकोन सकारात्मक विचार,समाजवून सांगुया..! शिवरायांचा, तुकोबारायांचा, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, स्वच्छता, आदी विषयांवर गप्पा करूया..! लहान मुलं ही खरंच एखाद्या फुलणाऱ्या बागेसारखे असतात ती रंगीबेरंगी बाग तशीच फुलवू या...!
✍️ © - अजय मारोतराव भुजबळ , परभणी, मो.नं.8180941255


बदलत्या काळानुसार काही गोष्टी नामषेश झाल्या आहेत. आपलं लहानपण आणि आत्ताच्या मुलांच लहानपण जर तुलना केली तर मला तरी आज लहान व्हावं वाटत नाही. राहीला प्रश्न गोष्टी सांगाण्याचा, ही आजची मुलं साधं बातम्या बघु देत नाहीत सारखं ते तिडी मीडी चित्र बघत असतात. मला नाही वाटत आपण सांगत असलेल्या गोष्टींकडे ते लक्ष देतील.
उत्तर द्याहटवात्यांना त्यांच्या आवडीनुसार आपल्याला समजावून सांगावे लागले सर..! त्यांची मानसिकता तशी तयार करावी लागेल..!
हटवाएकदम जबरदस्त
हटवानक्कीच प्रयत्न करु
उत्तर द्याहटवाधन्यवाद ...…!
हटवाNice
उत्तर द्याहटवाThanks....!
हटवापरिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे पण परिवर्तना सोबत आपण माणूस हा भावना शून्य होता काम नये बाल पण या ग्याजेट मुळे हरवले आहे ते मिळवण्यासाठी मोबाईल रहित जागा निर्माण करावी लगे लेख खूप छान लिहला अजय छान👍👌💐💐💐
उत्तर द्याहटवाHo Bhau.... thanks for your complement
हटवाAjjinchyaaa gostinmadhe khup jivanpana asaychaa....
उत्तर द्याहटवाMi sudhya mazya ajji kadun khup gostincha asvad ghetla .....ani to sudhhaa roj jevnanantr ...gachhivar chandnyankade baghat aaajjichya mandivar aple doke theun khup ghosti aiiklya..����
हो... ते दिवस फार गोड आणि स्मरणिय आहेत राव
हटवा..!
आधी आपल्याला बदलावे लागेल कारण की आपणच मोबाईल व TV सारख्या उपकरणांमध्ये एवढे गुंतून गेलोय की लहान मुलांसोबत खेळणं व गोष्टी सांगणं विसरून गेलोय. लहान मूल जवळ असल्यास Mo. सारखे electronic वस्तू व tv बंद किंवा दूर असावा.
उत्तर द्याहटवासहमत... मुलांना वेळ देणे गरजेचे आहे
हटवाS.B.हीच का तुमची प्रतिक्रिया... धन्यवाद..!
हटवाखूप छान अभी...
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!
हटवाThanks you so much bhau
उत्तर द्याहटवा🙏🤝🙏😊
हटवावास्तव मांडलंय, पालकांनी याचा विचार करायला हवा, आजच्या पालकांनीच मुलांना मोबाईल आणि कार्टून्समध्ये गुंतवून ठेवलयं कारण त्यांच्या कडे मुलांसाठी वेळ नाहीये, तो वेळ त्यांना काढावा लागेल.. . .
उत्तर द्याहटवाबाकी खूप छान लिहिलयं .
Thanks for your best complement...
हटवाएकदम भारी लिहिलंय तु मला तर खुप आवडलं
उत्तर द्याहटवाकारण किती छान दिवस होते ते ज्या वेळेस आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे.
पण आज कालचे मुलं ही या् साठी हट्ट करत नाहीत आणि त्यांनी त्या साठी हट्ट केला तर त्या मुलांचे पालक लगेच त्याला मोबाइल देतात आणि त्यांना शांत करतात. मोबाइल हा लहान मुलांना देऊच नये असे माझे मत आहे
Thanks for your Best Complement...!😊🤝😊
हटवाSmartphone ani TV ne mothya mansancha fayada zala ani lahan mulancha tota
उत्तर द्याहटवाTyat vibhakt kutumb paddhati
हो विभक्त कुटुंब पध्दतीने तर फारच परिणामकारक कृत्य केले आहे...! कुटूबांतील आपुलकी आणि नातेबंधंनांवर
हटवाया लेखातून आजकालचे गंभीर वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न उत्तम होता.हल्ली आपण सजीव वस्तूंपेक्षा निर्जीव वस्तुंना अतिमहत्त्व देतो,त्यामुळे आजी-आजोबांसारखी मायेची साठवण कधी कधी अडगळ बनून जाते.यावर तोडगा काढायचा तर कुटुंबातुन प्रयत्न झाले पाहिजेत .आजच्या पिढीमध्ये योग्य ती संस्कारमुल्ये प्रत्येक कुटुंबातून रुजवणे अत्यंत गरजेचे आहे .
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर ... सहमत आहे आपल्या मताशी
हटवाचला सर्व जन प्रयत्न करू
उत्तर द्याहटवाहो नक्कीच...!
हटवाखूप सुंदर ...खरोखर आजची पिढी मोबाइल कडे एवढी आकर्षित झाली आहे की त्यामुळे त्याना आपले मित्र ,व इतरांना वेळ देणं गरजेचं वाटत नाही ...ही गोष्ट ही मात्र खरी आहे की तंत्रज्ञाना सोबत आपण बदललं पाहिजे.पण जर आपल्याला नातेसम्बन्ध जपायचे असतील तर आवश्यकतेपेक्षा जास्त वापर टाळला पाहिले हे कुठे तरी बदललं पाहिजे .
उत्तर द्याहटवाधन्यवाद...सहमत हूं आपकी राय से
हटवाघरातील वातावरण आणि संस्कारांचा भाग आहे सगळा.आपल्याच हातात असतात गोष्टींना कसा आकार द्यायचा. मुलं ऐकत नाही,हट्टी झालेत,त्यांना फोनच लागतो, टीव्ही शिवाय जेवत नाही अशी कारणं देणाऱ्या पालकांची मला कीव येते कारण हे वळण त्यांच्यामुळेच मुलांना लागतं.आजची खरी संपत्ती आपली मुले आहेत याची जाणीव ठेऊन पालकांनी वागायला पाहिजे.आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्याला जे मिळालं ते मुलांना द्या...
उत्तर द्याहटवाधन्यवाद , बरोबर आहे तुमच्या मताशी सहमत आहे मी...!
हटवाखूप छान पृथ्करण केलेलं आहे अजय,अगोदरची पिढी आणि सध्याची पिढी यामध्ये फरक आहेच...
उत्तर द्याहटवाआपण गोष्टी ऐकून मोठे झालोत,सध्याची मुले electronic device मुळे गोष्टी ऐकण्यात रस दाखवत नाहीत....
पण घराघरांतून च जर पालकांनी त्यांना चांगल्या गोष्टी दाखवून संस्कार देण्याचा प्रयत्न केला तरी उत्तम बदल घडवता येईल.
धन्यवाद बरोबर आहे तुमचं... सहमत आहे मी आपल्या मताशी
हटवा