मुख्य सामग्रीवर वगळा

अत्त दीप भव...!

  • अत्त दीप भव...! स्वयं प्रकाशमान व्हा..!
गौतम बुद्ध सांगतात - ''तुम्ही स्वयं प्रकाशमान व्हा.!'' "स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका."
 अडिच हजार वर्षांपूर्वी मानवला मुक्तीचा,जिवन जगताना काय करावं काय करू नये याबद्दल त्यांनी सांगुन ठेवलं आहे.त्याच अनुषंगाने हे लिखाण.....!

दु:खापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभराची सगळी धडपड सुरू असते..त्या इच्छेपोटी सर्वांचा खटाटोप सुरू असतो. पण त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्गच आजही योग्य आहे..! #तृष्णा पासून मुक्ती..!
मुळात आपण जिवन जगताना वरवरच्या गोष्टींना नेहमीच फार प्राधान्य देतो.सध्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती व तंत्रज्ञानाचे, जाहिरातीचे आणि संगणकाचे आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ परिणाम हवा असतो.आपणांस आपल्या आजुबाजूला धावते जग दिसून येईल सर्वत्र..! प्राचिन काळापासून आजतागायत झालेले बदल सुध्दा लक्षात येतील...! पूर्वी माणुस कसा जिवन जगायचा आणि आज कशाप्रकारे जिवन जगत आहे तरी सुद्धा त्याला समाधान मिळतं नाही..!आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या गरजा या वाढतच असतात. असे म्हणतात की माणसाच्या गरजा या कधीही पूर्ण होत नाहीत. एक गरज संपली की त्याची दुसरी गरज लगेच निर्माण होते.पूर्वी माणुसकीचा झरा वाहता होता.आणि माणूस पायी चालत प्रवास पूर्ण करायचा.आज वाहनं असुन सुद्धा तो आपल्या वागणुकीत बदल निर्माण करत आहे गरजे नुसार. आज आपण बघतो आहोत मानवाकडे एवढी धनसंपदा, सुखचनीच्या व त्याच्या हाती सत्ता असूनही मानव दु:खीकष्टी व वेदनेने गुरफटलेला आहे. तो सुख मिळविण्यासाठी सुखाच्या मागे जिवाच्या आकांताने धावतोच आहे, धावतोच आहे.कसा होईल माणूस सुखी..?
           हा प्रश्न वाटतो तेवढा ही सोप्पा नाहीय..? पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केला तर नक्कीच आपल्या उत्तर मिळेल..! बुध्दांना समजुन घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यांला या कोड्यातून सुटका मिळेल..! मात्र बुध्द समजून घेणं फार अवघड आणि आव्हानात्मक काम आहे..! आपण साहवी-सातवी मध्येच शिकलो आहोत ; बुध्दांनी सांगितलेली अष्टांग मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी,
                                                         या अष्टांगासोबतच शील आणि प्रज्ञेलासुद्धा विशेष महत्त्व आहे.  शील म्हणजे नीतिमत्ता. हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, नशा आणणाऱ्या द्रव्याचे सेवन न करणे, दुसऱ्याच्या वस्तूवर हक्क न गाजवणे या पाच गोष्टींचा समावेश आहे. प्रज्ञा याचा अर्थ ज्ञान. सत्याचे ज्ञान. जग जसे आहे तसे पाहणे हे केवळ प्रज्ञेने शक्य होते..! मात्र हे सर्व आत्मसात करणं खरंच खूप अवघड आहे असं मला वाटतं..! कारणं माणूस दिवसेंदिवस स्वार्थी होत चालला आहे..!या मध्ये माझा सुद्धा समावेश आहे..! या साऱ्या गोष्टींतून बुद्ध धम्म आणि बुध्दांची विचारधारा नक्कीच आपल्याला साहाय्य आहे..!अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिल्यावरसुद्धा भगवान गौतम बुद्ध म्हणतात की, जर तुम्हाला एखादी गोष्ट स्वीकारावयाची असेल, तर तुम्हाला ती पटली तरच ती स्वीकारा, दुसरे म्हणतात म्हणून स्वीकारू नका.  भगवान बुद्ध असाही उपदेश देतात की, अत्त दिप भव.. स्वत: पुढाकार घ्या आणि स्वयंप्रकाशित व्हा. स्वत:चा विकास तुम्ही स्वत:च करा...!

#चला_भगवान_गौतम_बुद्ध_समजावून_घेऊया
#मानवतावाद_निर्माण_करूया 
बुध्दांचे तत्त्वज्ञान अभ्यासून मानव जातच ही करुणामय, मैत्रीमय व मंगलमय करून विश्वभरात शांतता नांदो ही कामना करू या...! #सबका_मंगल_होय_रे

✍️©अजय भुजबळ 
मो.नं.8180941255

टिप्पण्या

  1. खूप मस्त लिखाण अजय अभ्यास पूर्ण लिखाण आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. खूप भारी लिहलंय अजय...all the best...❤️🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...