- अत्त दीप भव...! स्वयं प्रकाशमान व्हा..!
गौतम बुद्ध सांगतात - ''तुम्ही स्वयं प्रकाशमान व्हा.!'' "स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका."
अडिच हजार वर्षांपूर्वी मानवला मुक्तीचा,जिवन जगताना काय करावं काय करू नये याबद्दल त्यांनी सांगुन ठेवलं आहे.त्याच अनुषंगाने हे लिखाण.....!
दु:खापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभराची सगळी धडपड सुरू असते..त्या इच्छेपोटी सर्वांचा खटाटोप सुरू असतो. पण त्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्गच आजही योग्य आहे..! #तृष्णा पासून मुक्ती..!
मुळात आपण जिवन जगताना वरवरच्या गोष्टींना नेहमीच फार प्राधान्य देतो.सध्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती व तंत्रज्ञानाचे, जाहिरातीचे आणि संगणकाचे आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ परिणाम हवा असतो.आपणांस आपल्या आजुबाजूला धावते जग दिसून येईल सर्वत्र..! प्राचिन काळापासून आजतागायत झालेले बदल सुध्दा लक्षात येतील...! पूर्वी माणुस कसा जिवन जगायचा आणि आज कशाप्रकारे जिवन जगत आहे तरी सुद्धा त्याला समाधान मिळतं नाही..!आपल्याला माहीतच आहे की माणसाच्या गरजा या वाढतच असतात. असे म्हणतात की माणसाच्या गरजा या कधीही पूर्ण होत नाहीत. एक गरज संपली की त्याची दुसरी गरज लगेच निर्माण होते.पूर्वी माणुसकीचा झरा वाहता होता.आणि माणूस पायी चालत प्रवास पूर्ण करायचा.आज वाहनं असुन सुद्धा तो आपल्या वागणुकीत बदल निर्माण करत आहे गरजे नुसार. आज आपण बघतो आहोत मानवाकडे एवढी धनसंपदा, सुखचनीच्या व त्याच्या हाती सत्ता असूनही मानव दु:खीकष्टी व वेदनेने गुरफटलेला आहे. तो सुख मिळविण्यासाठी सुखाच्या मागे जिवाच्या आकांताने धावतोच आहे, धावतोच आहे.कसा होईल माणूस सुखी..?
हा प्रश्न वाटतो तेवढा ही सोप्पा नाहीय..? पण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केला तर नक्कीच आपल्या उत्तर मिळेल..! बुध्दांना समजुन घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यांला या कोड्यातून सुटका मिळेल..! मात्र बुध्द समजून घेणं फार अवघड आणि आव्हानात्मक काम आहे..! आपण साहवी-सातवी मध्येच शिकलो आहोत ; बुध्दांनी सांगितलेली अष्टांग मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी,
या अष्टांगासोबतच शील आणि प्रज्ञेलासुद्धा विशेष महत्त्व आहे. शील म्हणजे नीतिमत्ता. हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, नशा आणणाऱ्या द्रव्याचे सेवन न करणे, दुसऱ्याच्या वस्तूवर हक्क न गाजवणे या पाच गोष्टींचा समावेश आहे. प्रज्ञा याचा अर्थ ज्ञान. सत्याचे ज्ञान. जग जसे आहे तसे पाहणे हे केवळ प्रज्ञेने शक्य होते..! मात्र हे सर्व आत्मसात करणं खरंच खूप अवघड आहे असं मला वाटतं..! कारणं माणूस दिवसेंदिवस स्वार्थी होत चालला आहे..!या मध्ये माझा सुद्धा समावेश आहे..! या साऱ्या गोष्टींतून बुद्ध धम्म आणि बुध्दांची विचारधारा नक्कीच आपल्याला साहाय्य आहे..!अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिल्यावरसुद्धा भगवान गौतम बुद्ध म्हणतात की, जर तुम्हाला एखादी गोष्ट स्वीकारावयाची असेल, तर तुम्हाला ती पटली तरच ती स्वीकारा, दुसरे म्हणतात म्हणून स्वीकारू नका. भगवान बुद्ध असाही उपदेश देतात की, अत्त दिप भव.. स्वत: पुढाकार घ्या आणि स्वयंप्रकाशित व्हा. स्वत:चा विकास तुम्ही स्वत:च करा...!
#चला_भगवान_गौतम_बुद्ध_समजावून_घेऊया
#मानवतावाद_निर्माण_करूया
बुध्दांचे तत्त्वज्ञान अभ्यासून मानव जातच ही करुणामय, मैत्रीमय व मंगलमय करून विश्वभरात शांतता नांदो ही कामना करू या...! #सबका_मंगल_होय_रे
✍️©अजय भुजबळ
मो.नं.8180941255

खूप छान
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर..👌👌👌👌
हटवाSunder likhan Ajay
उत्तर द्याहटवाधन्यवाद भाऊ..!😊✨🙏❣️
हटवाखूप मस्त लिखाण अजय अभ्यास पूर्ण लिखाण आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद..!
हटवाखुप सुंदर लिहिलय.👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!✨😊
हटवाखूप सुंदर लिहलंय अजय..��
उत्तर द्याहटवाThanks govind
हटवाखूप छान आहे भाऊ
उत्तर द्याहटवाखूप भारी लिहलंय अजय...all the best...❤️🙏
उत्तर द्याहटवा