मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाणुन घ्या - कोण होते लोकनेते दि.बा. पाटील ज्यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव दिले आहे.

जाणुन घ्या -     कोण होते लोकनेते दि.बा. पाटील ज्यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव दिले आहे. © अजय भुजबळ / दि.२९ जून  वाचा सविस्तर लेखांकित रिपोर्ट -  •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• शिवसेना साठी मुंबई   हा आत्मीयतेचा विषय. बऱ्यापैकी आजही मुंबई म्हटलं की बाळासाहेब ठाकरे , शिवसेना या गोष्टी अनावधानाने का होईना राजकीयदृष्ट्या ;  जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. शिवसैनिकांच्या सहित मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील आतंरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचं असं महाविकास आघाडी सरकार कडून निश्चित झालेलं असतांनाही आज ऐणवेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला  दि.बा. पाटील यांचे नाव मंजूर करण्यात आल्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात काय घेतला गेला.? आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा निर्णय घेण्यासाठी काय गोष्टी कारणीभूत ठरल्या.? आणि कोण होते दि.बा. पाटील ज्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

अमेरिका : अशांतता, आणि हत्याकांड

        अमेरिका : अशांतता, आणि हत्याकांड (मे महिन्यातील टेक्सा शाळेतील प्रकरण त्यावर आधारित लेख) जागतिक महासत्ता असलेलं आणि जगाला शहाणपणा शिकवणार राष्ट्र अमेरिका मात्र अशांत आणि रक्तरंजित झालेलं आहे. हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना ; संवेदनशील मानवी मनाला अस्वस्थ करणारी ठरते. मुळात हे आज पहिल्यांदा होते असे नाही याच्या अगोदर अस्वस्थ करणारी घटनाक्रम अमेरिकेच्या पातळीवर घडलेली आहेत. स्वतःला महासत्ता म्हणून मिरवणारं राष्ट्र आज का या मुग गिळून गप्प बसले आहे..? तिथल्या हत्याकांडाला आणि अस्ताव्यस्त परिस्थितीला कोण जबाबदार आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जबाबदारी स्वीकारणार आहेत का.? आपल्या भारतामध्ये शस्त्रास्त्रांचा बंदी आहे मात्र अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये सहजरीत्या खेळ भांडी खेळावेत अशी लहान मुलं देखील शस्त्रास्त्र लपून वापरतांना दिसतात. मुळात अमेरिकेत होणारी शस्त्रास्त्रांची खरेदी विक्री याच्यावर बंधन नाहीये ते बंधन यावं यासाठी कित्येक दिवसापासून तोडगे उपाय योजना करण्यासाठी तिकडले सरकार अयशस्वी ठरले आहे असेच म्हणावे लागेल.अत्याधुनिक तंत्रज्ञान...

रक्तरंजित काश्मीर... काश्मीर आणि कश्मीरी पंडित...

                    रक्तरंजित काश्मीर..? काश्मीर आणि कश्मीरी पंडित..?   काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना सीमेपलीकडून पाठिंबा मिळत आहे, हे उघड सत्य आहे. आता काश्मीर खोर्‍यात टार्गेट किलिंग हे रोजचेच झाले आहे.  गेल्या काही दिवसांत झालेल्या हत्येबद्दल लोकांचा संताप संपत नव्हता तोच आणखी एका बँक कर्मचाऱ्याची कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली.  तो राजस्थानचा रहिवासी होता.  नुकत्याच झालेल्या हत्येबद्दल संतप्त, काश्मिरी पंडित आणि मैदानी भागात काम करणार्‍या लोकांनी निषेध केला आणि म्हटले की जर सरकार त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करू शकत नसेल तर त्यांना पुन्हा एकदा खोरे सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.  यावर सरकारने खोऱ्यात काम करणाऱ्या हिंदूंना सुरक्षित ठिकाणी पाठवले जाईल, असे आश्वासन दिले आहे.  पण लक्ष्यित हत्या रोखण्यासाठी त्यावर उपाय म्हणून पाहिले जात नाही.  गेल्या वर्षभरात सोळा काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.  म्हणजेच दहशतवाद्यांवर दहशत माजवून त्यां...

खरीप हंगामात - जाणून घ्या या वर्षी काय राहिल खत पुरवठा परिस्थिती व खतांचा भाव

३ महिन्यांत मिश्र खतांच्या बरोबर, पोटॅशीम देखील महाग...  परिवर्तन एक शोध, लाईव्ह न्यूज / ५ जून २०२२  रशिया-युक्रेन युद्धाची झळ पूर्व युरोपासह इतरही देशांना सहन करावी लागली आहे. याचा फटका भारतालाही सहन करावा लागला आहे. दरम्यान, रशिया व युक्रेन युद्धामुळे पोटॅशच्या ५० किलोच्या बॅगचे दर गेल्या चार महिन्यांत ७०० रुपयांनी वाढले. पूर्वी १ हजाराला मिळणारी बॅग आता १७०० रुपयांना मिळते. पिकाच्या जोमदार वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यावर बोजा वाढला आहे. मान्सूनचं केरळात आगमन झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांची खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते. यंदा मात्र खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. सगळ्याच कंपन्यांच्या खतांच्या दर वाढल्याचं दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गत तीन महिन्यांत पोटॅशचे दर १ हजार रुपयांवरून १७०० रुपयांवर पोहोचले आहेत. पोटॅश दरवाढीमुळे मिश्रखतांच्या किंमतीही १०० ते २५० रुपयांनी वाढल्या. दुसरीकडे डीएपी खताचे दरही १०० रुपया...

शेतकरी बंधूंनो कामाला लागा, चिंता सोडा - कृषी विभागाचा सल्ला - काय आहे सल्ला वाचा सविस्तर रिपोर्ट

कामाला लागा, चिंता सोडा - शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला  परभणी, अजय भुजबळ / ५ जून २०२२,  खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर आला असून शेतकऱ्यांची देखील धावपळ सुरु झाली आहे. याच दरम्यान, बियाणे आणि खताबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने शेतकरी चिंतेत असून अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी न पाडण्याचे आवाहन केले असून बी-बियाणांचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांची चिंता न करता कामाला लागण्याची गरज आहे. यंदा मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे शेतकरी देखील शेती मशागतीचे कामे सुरु केले. महाराष्ट्रात मान्सून लवकरच दाखल होणार असून यामुळे शेतकरी बियाणे आणि खत खरेदी करताय. मात्र, बियाणे आणि खताबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करुन अधिकच्या दराने बियाणे आणि खताची विक्री होऊ शकते. अफवांना बळी पडू नका? राज्यात बियाणांचा मुबलक साठा तर आहेच पण खताचीही चिंता भासणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी प...

कश्मिरी पंडितांवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

कश्मिरी पंडितांवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता मुंबई, दि. ५ जून : गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. खोऱ्यातील या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.पुढे ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण...

महाराष्ट्रात मान्सूनचा अंदाज / मान्सून अपडेट

  मान्सूनबाबत हवामान खात्याचा दिलासादायक अंदाज पूणे / अजय भुजबळ ,  ५ जून २०२२ महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं खरंतर वर्तवला होता. मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. अशातच हवामान खात्यानं मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजीचं केरळात प्रवेश केला होता. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळं तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये पोहोचेल, असं भाकीत हवामान विभागानं केलं होतं. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला.त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे. पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यानं लगतच्या बहुतांश भागांत मान्सूननं प्रवेश केला आहे. य...

महाराष्ट्र राज्य सरकारचे निर्देश - या दिवशी साजरा होणारा शिवस्वराज दिन - राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र वासियांच्या नव्हे तर देशवासीयांचे आदर्श, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारे छत्रपती शिवराय. यांच्या कार्य कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण त्यांचा इतिहास वारसा जोपासण्यासाठी. पुन्हा आठवावे शिवरायांचे रूप आठवावा शिवरायांचा प्रताप या उक्तीप्रमाणे राज्यात सोमवार दि. 6 जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यास...