जाणुन घ्या -
कोण होते लोकनेते दि.बा. पाटील ज्यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव दिले आहे.
वाचा सविस्तर लेखांकित रिपोर्ट -
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
शिवसेना साठी मुंबई हा आत्मीयतेचा विषय. बऱ्यापैकी आजही मुंबई म्हटलं की बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या गोष्टी अनावधानाने का होईना राजकीयदृष्ट्या ; जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. शिवसैनिकांच्या सहित मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील आतंरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचं असं महाविकास आघाडी सरकार कडून निश्चित झालेलं असतांनाही आज ऐणवेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव मंजूर करण्यात आल्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात काय घेतला गेला.? आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा निर्णय घेण्यासाठी काय गोष्टी कारणीभूत ठरल्या.? आणि कोण होते दि.बा. पाटील ज्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केला..? या संबंधित हा सदरील लेख :-
गेल्या काही वर्षापासून पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणची स्थानिक मंडळी आणि रायगड मधील लोकनेते दिनकर बाळू उपाख्य दि.बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं यासाठी कृती समिती देखील स्थापन करण्यात आली होती आणि या कृती समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिनकर बाळू पाटील यांचे नाव द्यावे यासाठी साखळी आंदोलन, निवेदन आणि मागण्या सरकार दरबारी ठेवण्यात येत होत्या. आझाद हिंद महाराष्ट्र राज्य संघटनेचे युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर अण्णा दवळी व अन्य भुमिपुत्रांनी त्या अनुषंगाने मुंबईतील सिडको कार्यालयावरही आंदोलन करत अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. आणि शेवटी महाविकास आघाडीच्या सरकार कडून हा निर्णय घेण्यात आला.
कोण होते लोकनेते दि.बा पाटील.? यावर एक दृष्टिक्षेप :
दि.बा. पाटील यांचे संपूर्ण नाव दिनकर बाळू पाटील रायगड जिल्ह्यातील जाईस या गावी त्यांचा १३ जानेवारी १९२६ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झालेला. त्यांचे वडील बाळू गौरू पाटील हे पेशाने शिक्षक व शेतकरी होते. त्यांच्या आई मधुबाई ह्या गृहिणी होत्या. वडील शिक्षक असल्याकारणाने शिक्षणामध्ये त्यांचा रस होता त्या कारणे खडतर परिस्थितीमध्ये देखील प्राथमिक शिक्षण स्थानिक पातळीवर पूर्ण केले. मुंबईत बि.ए. आणि त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये वकीलकीत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात संघटनात्मक रीत्या कार्य करायला सुरुवात केली. सामाजिक कार्याचा वारसा पाठीशी लाभल्यामुळे हळूहळू त्यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हायला सुरुवात केली आणि त्या काळी राज्याच्या राजकारणात दबदबा आणि वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. पूढे राजकीय अनुभवाच्या बळावर ते पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष कालांतराने विधिमंडळात पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे जनप्रतिनिधी म्हणून ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगड लोकसभेचे दि.बा.पाटील यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं.
दि.बा.चे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान :
१९५१ दरम्यान दि.बा. यांचे वकीलकिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते सामाजिक चळवळी झोकले गेले होते. संघटनात्मक पातळीवर त्यांना पसंत करणारा स्थानिक पातळीवरील जनसमूह मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्यांना मित्रांनी प्रोत्साहन देत जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यानिवडणूकीत ते बहुमताने निवडून देखील आले. मात्र त्या कार्यकाळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वारे वाहू लागलेलं असतांना १९५६ मध्ये जिल्हा लोकल बोर्डचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:ला संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वाहून घेतले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांना तुरूंगवास देखील भोगाला.
१९७० - ८० च्या दशकात शेतकरी, कामगार प्रकल्पग्रस्तांचे तारणहार :
तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात त्यावेळी सरकारी संस्था सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) माध्यमातून मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे ; नवी मुंबईची बांधणी करण्यात येत होती. तेव्हा सिडकोनं विकास कामांसाठी पनवेल, उरण, बेलापूर, पट्ट्यातील आगारी समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात भुसंपादनाचा विषय ऐरणीवर ऐवून ठेपला होता तेव्हा तिथल्या शेतकरी, कामगार प्रकरणग्रस्तांचा आवाज म्हणून दि.बा.पाटील यांनी लढा दिला. आंदोलन पुकारले, आंदोलन चिघळल्या मुळं शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावं लागले, तत्कालीन सरकार मधील मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नमत घेऊन, त्यावर काढण्यासाठी दि.बा.यांच्याशी चर्चा केली चर्चाअंती प्रकल्पाग्रस्तांना जमीनीच्या बदलत्या साडेबारा टक्के भुखंड मोबदला त्सायांनंतर १९९४ पासून साडेबारा टक्के योजने अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विकसित भूखंड देण्याबरोबरच जमीनीचा एकरी भाव देण्याचा निर्णयही घ्यावा लागला. तिथल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या पातळीवर शेतकरी कामगार आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्या घटने बरोबर विधीमंडळ सभागृहात त्यांचे अनेक भाषणं मागण्या गाजलेल्या आहेत.
पूढे शिवसेनेत प्रवेश :
दि.बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून १६ ऑगस्ट १९९९ रोजी बाहेर पडले. नंतर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेकांना त्यांच्या या निर्णयाचे अविचित वाटलं, पुरोगामी,सामाजिक विचारसरणीचे निर्धर्मी राजकीय नेतृत्व असल्याने त्यांचा हा निर्णय अनेकांना पटला नाही, नंतर निवडणुकीत पराभव झाल्याने राजकारणातून सक्रिय राजकारणातून त्यांचा सहभाग हळूहळू कमी होत गेला मात्र अखेरच्या श्वासापर्यंत शेतकरी कामगार आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ते लढत राहिले ओबीसी प्रश्नांसाठी ते लढत राहिले मंडल आयोगाच्या संदर्भातही त्यांची भूमिका ओबीसी समाजाच्याच्या हित समर्थनात होती.
24 जून 2013 रोजी त्यांचे निधन झालं. पाच दशकं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जनसमूहाशी नाळ जोडलेल्या या व्यक्तीच्या कार्याखातर 28 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला.
- लेख कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा. ललवकर परिवर्तन एक शोध या युटूब चॅनल वर यां संदर्भात व्हिडिओ पोस्ट करेल..! धन्यवाद..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा