मुख्य सामग्रीवर वगळा

कश्मिरी पंडितांवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

कश्मिरी पंडितांवरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई, दि. ५ जून : गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. खोऱ्यातील या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.पुढे ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.
१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...