अमेरिका : अशांतता, आणि हत्याकांड
जागतिक महासत्ता असलेलं आणि जगाला शहाणपणा शिकवणार राष्ट्र अमेरिका मात्र अशांत आणि रक्तरंजित झालेलं आहे. हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना ; संवेदनशील मानवी मनाला अस्वस्थ करणारी ठरते. मुळात हे आज पहिल्यांदा होते असे नाही याच्या अगोदर अस्वस्थ करणारी घटनाक्रम अमेरिकेच्या पातळीवर घडलेली आहेत. स्वतःला महासत्ता म्हणून मिरवणारं राष्ट्र आज का या मुग गिळून गप्प बसले आहे..? तिथल्या हत्याकांडाला आणि अस्ताव्यस्त परिस्थितीला कोण जबाबदार आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जबाबदारी स्वीकारणार आहेत का.? आपल्या भारतामध्ये शस्त्रास्त्रांचा बंदी आहे मात्र अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये सहजरीत्या खेळ भांडी खेळावेत अशी लहान मुलं देखील शस्त्रास्त्र लपून वापरतांना दिसतात. मुळात अमेरिकेत होणारी शस्त्रास्त्रांची खरेदी विक्री याच्यावर बंधन नाहीये ते बंधन यावं यासाठी कित्येक दिवसापासून तोडगे उपाय योजना करण्यासाठी तिकडले सरकार अयशस्वी ठरले आहे असेच म्हणावे लागेल.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढारलेले हे राष्ट्र त्यामुळे मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून गेमिंगच्या आहारी गेलेली चिमुरडी मुले, मोबाईलवर बंदूकधारी हिंसक गेम खेळून ; हिंसक होताना दिसतात. या कारणामुळे कदाचित अमेरिकेतील मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढते आहे. अमेरिकेतील टेक्सा मधील अठरा वर्षाच्या मुलाने केलेला गोळीबार. या शाळकरी मुलाने केलेल्या या हत्याकांडाने अवघे जग निशब्द आणि व्याकूळ झाले आहे. यामुळे स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिका सारख्या राष्ट्राने या प्रकरणातून धडा घेत आपल्या देशातील हिंसाचार आणि अशा स्वरूपातील हत्याकांड थांबवायचे असतील त्यांना आळा घालायचा असेल तर देशातील शस्त्रास्त्र आणि बंदूक लॉबी यांच्या बिग खरेदी विक्रीवर बंदी आणावी लागेल...!
सामूहिक हत्याकांडाच्या घटनेने अमेरिका पुन्हा एकदा रक्तबंबाळ झाली आहे. अचानक कोणीतरी माथेफिरु गर्दीच्या ठिकाणी गोष्ट बेछूट गोळीबार करतो आणि बंदुकीतील गोळ्या संपेपर्यंत निरपराध लोकांच्या शरीरात गोळ्या सोडतो. ही घटना काही नवीन नाही अमेरिकेसाठी याच्या अगोदरही अनेक घटना सत्र घडलेली आहेत एकाहून एक शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत आले आणि गेले पण आशा गोळीबाराच्या घटनेनंतर हातभर आणि अगतिक प्रतिक्रिया देण्यापलीकडे एकही राष्ट्राध्यक्ष ठोस उपाययोजना करू शकला नाही.त्यामुळे तेथील समाजकंटक आणि माथेफिरू वृत्तीचे लोक मोकाट झाली आहेत सर्वसामान्य माणसांचे मरण स्वस्त झालंय. अमेरिकेच्या टेक्सास हा प्रांतातील उवाल्डे येथील गोळीबाराच्या ताज्या घटनेने तर साऱ्या जगाला कंटाळा बसवल्या आहेत. अठरा वर्षाचा एक माथेफिरू उतरून आधी घरी आपल्याजवळ गोळ्या झाडतो नंतर शाळेत गोळ्या झाडतो. गोळ्या झाडल्या अगोदर समाज माध्यमांवर एक दिवस आगोदर पोस्ट देखील शेअर करतो तरीदेखील ते त्यास रोखण्यासाठी तेथील सरकारला काही ठोस उपाययोजना करणं शक्य होत नाही. अठरा वर्षाच्या तो मुलगा ज्याला मिसरूड्या फुटल्या नाहीत. तो एके फोर्टी सेव्हन घेऊन शाळेत घुसतो आणि निर्घृणपणे शाळकरी मुलांवर गोळीबार करतो ज्यामध्ये १८ विद्यार्थी मृत्युमुखी पडतात आणि ३ शिक्षक सुद्धा मृत्यु मुखी पडले. अमेरिकेमध्ये अधून मधून अशा घटना घडत असतात मात्र ही घडलेली घटना पहिल्यांदा मोठ्या स्वरूपातील अमानवीय दूर्देवी घटना समजली जाते. विशेषता अचंबित करणारी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मारेकरी माथेफिरु नी स्वतःदेखील गोळी झाडून घेतली. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की अमेरिकेतील विद्यार्थी वर्ग तरुण वर्ग किती मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त आहे.? १८ वर्षाचा माथेफिरू तरूण क्षणार्धात शेकडो गोळ्यांचा वर्षाव करतो ती कुठली मानसिक विकृती.? हत्याकांड घडवणाऱ्या सलवडोर नामक हल्लेखोर आज पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केले पण शाळेच्या प्रांगणात त्याने जे मृत्यूचे तांडव घडवले ते दुर्दैवी म्हणावे लागेल. आणि ते कोणीच रोखू शकले नाही हे त्यापेक्षाही मोठे दुर्दैव आहे. या हत्याकांडानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बंदूक लॉबीला जबाबदार धरले आहे. “ अमेरिकेत बंदुकीचा बाजार खूप मोठ्या वेगाने वाढत आहे एक राष्ट्र म्हणून आपण बंदूक लोभी च्या विरोधात कधी उभे राहणार ?असा सवाल यांनी देशवासीयांना उद्देशून केला मात्र देशातील ताकद वान बंदूक रायफल लॉबिशी दोन हात करण्याचं सामर्थ्य राष्ट्राध्यक्षांन मध्ये तरी आहे का.?
या घटना काही नव्या नाही घेत या अगोदर २०१२ मध्ये देखील घडले होते आणि हे सर्व मृत्युचे तांडव थांबवायचे असेल तर अमेरिकेत बंदूक लॉबी वर नियंत्रण आणणं आणि बंदी आणणं हेच योग्य ठरेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा