कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंतेच सावट पसरल्या नंतर, त्यासंबंधीच्या उपाययोजना, सर्वसामान्यांची जनजागृती करण्यासाठी सरकार पातळीवरून कडेकोट प्रयत्न करण्यत येत होते. तरी सुद्धा कोरोना संकट तोंड वर करून उभे राहताना दिसत असताना, राजकीय सत्ता नाट्य संपल्यानंतर आता त्यासंबंधीच्या उपाययोजना करण्यासाठी फडणवीस-शिंदे सरकार कडून ठोस पावले उचलली जात असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतील निर्णयावरून लक्षात येते ,
काय आहे मोफत ‘बुस्टर डोस’बाबतचा निर्णय :
दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत कोरोनाचा बुस्टर डोस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. 15) पुढील 75 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे.. या निर्णयाची महाराष्ट्रात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
‘बुस्टर डोस’च्या मोहिमेत एकही दिवस वाया घालू नका. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ‘बूस्टर डोस’ मिळालाच पाहिजे, यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्थांनाही सहभागी करून घ्या.. त्यासाठी पुरेशी जनजागृती करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागास दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा