काँग्रेसची देशभरात ‘संकल्प सत्याग्रह’ आंदोलने
(रविवारी नवी दिल्ली राजघाट बाहेर राहुल गांधींच्या खासदारपदाच्या अपात्रतेच्या निषेधार्थ 'संकल्प सत्याग्रह'मध्ये प्रियंका गांधी)
Written by : © Ajay Bhujbal
परिवर्तन एक शोध टीम / नवी दिल्ली
March 27, 2023 11:40:54
रविवारी राजघाट नवी दिल्ली येथे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी भाजपाने आपला भाऊ राहुल गांधी यांना 'देशद्रोही' म्हटल्याबद्दल आणि नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केल्याबद्दल भाजपवर टीकास्त्र सोडले.
महात्मा गांधी स्मृती स्थळ राजघाट बाहेर 'संकल्प सत्याग्रह' येथे एका सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, भाजप नेत्यांनी वारंवार आमच्या कुटुंबाचा अपमान केला आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांचा वारंवार अपमान करायचं भाजपाच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे.
राहुल गांधी यांच्या संसदेतील अपात्रतेच्या निषेधार्थ प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली देशभरात अशा प्रकारेच बहूसंख्य ठिकाणी संकल्प सत्याग्रह आंदोलने पार पडली. रविवारी संकल्प सत्याग्रह आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी, महापुरुषांच्या स्मारकाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. प्रियांका गांधी पुढे बोलताना म्हणाल्या
"तुम्ही माझ्या भावाला, शहिदांच्या मुलाला, देशद्रोही म्हणता आणि तुमच्या मंत्र्याने संसदेत माझ्या आईचा अपमान केला. तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी सांगितले की राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहेत हे देखील माहित नाही. तुमचे पंतप्रधान विचारतात की हे कुटुंब काय करते? नेहरूंना नाव ठेवू नका... सत्तेचा गैरवापर करून, तुम्ही मनमानी पद्धतीने कारभार करू नका... तुम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान केला आहे," त्या म्हणाल्या, सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्या बोलण्याने आणि कृतीने देशवासीयांच्या मनातून दूर जात आहेत. भाजपा सरकार खोटी कारणं दाखवून विनाकारण गांधी परिवारातील सदस्यांना परेशान करू शकणार नाहीत नेहमीच सत्याचा विजय होतो, हे आपण लक्षात ठेवायला हवे. "एकाधिकारशाहीला - डरो मत" असं म्हणत प्रियांका गांधी पुढे बोलताना म्हणाल्या : आम्ही व्यक्तिशः कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करत नाहीत. पाठीमागे काही दिवसांपूर्वी संसदेत राहुल गांधींनी मोदींना मीठी मारून सांगितले होते की द्वेषाची भावना सोडून प्रेमभाव जोपासा, ज्या भाजपाच्या नेत्यांनी राहूल गांधींना पप्पू म्हणून हिणवले त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी देशभरात चाललेल्या भारत जोड यात्रेत लाखो लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद पाहून भाजपच्या मंडळींच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राहुल गांधींनी, अडाणी, अंबानी आणि मोदी परस्पर संबंधांच्या बाबतीत उपस्थित केलेली प्रश्न. आणि देशात सुरू असलेल्या एकाधिकारशाहच्या विरोधातला कॉंग्रेसचा आवाज तुम्ही कदापि बंद करू शकणार नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा