नेपाळ, तिथले ग्रंथालय जळाले, इतिहास राख झाला: नेपाळच्या घटनेतून आपण काय शिकलो..?
विश्लेषणात्मक लेख
Written by : © Ajay Bhujbal
परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters
Published: September 14, 2023
23:30 PM (IST)
दूर्देव तुमचं आमचं आणि सर्वांचं: नेपाळमधील ग्रंथालयाच्या राखेचा अर्थ
आज सकाळी नेपाळच्या सिंहदरबार लायब्ररीची बातमी वाचून मन सुन्न झालं. हजारो वर्षं जपलेली स्मृती, अनेक पिढ्यांनी जतन केलेला वारसा, आणि आपल्या सामूहिक विचारविश्वाचा पाया पिसाळलेल्या गर्दीने काही तासांत राखेत कालवला. माझ्या नेपाळच्या प्रवासाच्या यादीत असलेली ही लायब्ररी आता केवळ एक जळलेला अवशेष म्हणून शिल्लक आहे. १२व्या शतकात झालेल्या उठावानंतर ती पुन्हा उभी राहिली होती. पण २०२५ च्या 'GenZ' उठावात ती कायमची संपली.
सांस्कृतिक वारशाची अपरिमित हानी
या घटनेकडे केवळ अपघाती नुकसान म्हणून पाहता येणार नाही. हा सांस्कृतिक वारसा जळणे म्हणजे काय लेव्हलचा तोटा आहे, हे शब्दांत किंवा आकड्यांत सांगता येणार नाही. 'द हिंदू' आणि 'टाईम्स ऑफ इंडिया' सारख्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या ग्रंथालयात चर्यापदासारखा ९व्या शतकातला प्राचीन संग्रह, मध्ययुगीन साहित्यकारांची लिखाणं, आणि हिंदू-बौद्ध समाजाच्या आध्यात्मिक परंपरेचे हजारो वर्षं जुने अनेक ग्रंथ होते – हे सगळं काही क्षणात संपलं. मला हे सगळं इतकं वैयक्तिक का वाटतंय, याचं कारण एकच आहे: जेव्हा पुस्तकं, शिल्पं, चित्रं आणि ऐतिहासिक साधनं नष्ट होतात तेव्हा मला माझं आयुष्य शून्य वाटायला लागतं. मी ज्या संस्कृतींत जन्मलो, जीने साहित्य-संगीत-कला ह्यांना जीवनाचा अविभाज्य भाग मानलं, ज्या ज्ञानपरंपरेतून मला स्वतःला घडवण्याची संधी मिळाली, ती राख होताना पाहणं असह्य आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती आणि क्रूर वास्तव
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इतिहासात असे प्रसंग वारंवार घडलेत. जेव्हा संघर्ष पेटतो तेव्हा सर्वप्रथम जळतात ती ही 'soft targets'. पण पुस्तकं, शिल्पं, कला ही समाजाचं 'soul' (आत्मा) असतात. आणि आत्मा नष्ट झाला की काय अस्तित्व राहतं?
उदाहरणार्थ: इसवी सन २००३ मध्ये, अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यावर बगदादमधील नॅशनल लायब्ररी अँड आर्काइव्ह्ज ऑफ इराक जाळली गेली. त्यात प्राचीन मेसोपोटामियन संस्कृतीचे दुर्मिळ दस्तावेज, हस्तलिखिते आणि कलाकृती नष्ट झाल्या. ही घटना केवळ इराकी जनतेची नव्हे, तर संपूर्ण मानवजातीची हानी होती. नेपाळमधील घटना याच क्रूर वास्तवाची पुनरावृत्ती आहे.
या युवकांच्या संतापामागे नक्कीच काही कारणं असतील. अन्याय, बेरोजगारी, राजकीय ताण… पण ‘मॉब जस्टिस’ (गर्दीने केलेला न्याय) हा कायम क्रूर आणि मूर्खपणाचा असतो. अशा हिंसेतून फक्त हानी जन्माला येते. लायब्ररी जाळणं म्हणजे स्वतःच्या इतिहासालाच अग्नी देणं. आणि इतिहास राखेत गेला की भविष्य रिकामं होतं.
चुक कोणाची.?
'हे GenZ बिनडोक आहेत, त्यांना प्राचीन ग्रंथांची काय अक्कल असणार?!' हे म्हणणं फार सोपं आहे. या जाळपोळ करणाऱ्या झुंडीचं समर्थन होऊच शकत नाही, पण त्याचबरोबर मला असंही वाटतं की तितकीच चूक तिथल्या नेतृत्वाची आहे. ज्यांनी हे आपलं 'heritage' (वारसा) आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अशी मूल्यंच कधी समाजात रुजवली नाहीत. अनेक माध्यमांनी दिलेल्या व्हिडियोजमध्ये हे दिसून येतंय की नेपाळच्या जाळपोळीत सगळे पर्यटकांना व्यवस्थित प्रोटेक्ट करत आहेत. कारण पर्यटक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे त्यांना कळतंय. हे पुस्तकांबाबत का नाही होऊ शकलं?
आज नेपाळचं दुःख पाहताना मला हे जाणवतंय की जगात कुठेही अशी घटना घडते तेव्हा तोटा आपल्या सर्वांचाच झालेला असतो. कारण ज्ञानाला सीमा नसतात, संस्कृतीला राष्ट्रीयत्व नसतं आणि मॉबला डोकं नसतं. ही केवळ नेपाळची नव्हे, तर आपल्या सर्वांची हानी आहे. एका पिढीने गमावलेलं ज्ञान पुन्हा मिळवता येणार नाही आणि त्याची किंमत मोजणंही शक्य नाही. ही घटना आपल्याला एक कटू सत्य शिकवून गेली आहे: ज्ञानाच्या मंदिरांचं रक्षण करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे, आणि ते विसरलो की त्याची किती मोठी किंमत मो
जावी लागते.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा