भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...
Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी
नमस्कार मित्रांनो..! तुम्हा सर्वांचे या ब्लॉग पेज वर आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. आपणास या ब्लॉग वर सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,कला, क्रिडा,प्रवास, विश्लेषण, चालू घडामोडी आणि ज्ञानवर्धक गोष्टींबाबत वाचायला मिळेल..! तर सबस्क्राईब करा फॉलोअप घेत रहा..!भेटत रहा या आधुनिक तंत्रज्ञानाचा गावात..! "Vatsaru - आम्ही शब्दांचे वारकरी" आपल्या माहिती साठी लिंक : https://vatsaruofwords.blogspot.com/