परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा: कुंभारीच्या सरपंच महिलेला स्वातंत्र्य दिनी लाल-किल्ल्यावर आमंत्रण
"गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या कुंभारीच्या सरपंच पार्वती हरकळ यांचा लाल किल्ल्यावर सन्मान." परभणी जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे!
परभणीचा गौरव: कुंभारीच्या सरपंच पार्वती हरकळ यांचा लाल किल्ल्यावर सन्मान! 🇮🇳
Written by : © Ajay Bhujbal
परिवर्तन एक शोध / दृष्टी प्रमोटर्स टीम
Published: 14 August, 2025 - 12:45 PM (IST)
परभणी, (दि. 14 ऑगस्ट, 2025)
येथील कुंभारी गावाच्या (ता. जिंतूर) सरपंच सौ. पार्वती शेषराव हरकळ यांनी परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यावर्षीच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी त्यांना विशेष पाहुण्या म्हणून आमंत्रण मिळाले आहे.
हा सन्मान केवळ त्यांच्या एकटीचा नाही, तर संपूर्ण परभणी जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील महिलांचा आहे. देशभरातील २८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून निवड झालेल्या केवळ २१० सरपंचांमध्ये सौ. हरकळ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या २१० पैकी महाराष्ट्रातील १५ सरपंचांची निवड झाली असून, त्यातील ९ महिला सरपंच आहेत, आणि त्यापैकी एक आपल्या परभणी जिल्ह्यातील आहेत.
"गावाचा विकास आणि महिलांचा सन्मान , जे राव न करी ते या उक्तीतून लोकसमुदाय आणि लोक सहभागातून गावाचा विकास – हीच खरी स्वातंत्र्याची जाणीव!" हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या सौ. पार्वती हरकळ यांच्या नेतृत्वाखाली कुंभारी गावाचा विकास होत आहे. त्यांच्या या निवडीने 'महिलाशक्ती'चा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल.
या अतुलनीय कामगिरीबद्दल परिवर्तन एक शोध आणि दृष्टी प्रमोटर्स कडून सौ. पार्वती ताई हरकळ यांचे हार्दिक अभिनंदन!
---
#परभणीचा_अभिमान #स्वातंत्र्यदिन२०२५ #कुंभारीसरपंच #महाराष्ट्राचेमोती #महिलाशक्ती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा