मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी चित्रपटसृष्टीतून रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट.

ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड मुंबई, मराठी चित्रपटसृष्टीतून रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे.मराठी चित्रपट सृष्टीत छाप सोडणाऱ्या, आपल्या अभिनयाच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांच आज सकाळी मुंबई येथे राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मावळली. त्या 61 वर्षाच्या होत्या. या अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने मराठी मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.  महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, या हरहुन्नरी कलाकारांबरोबर एका पेक्षा एक चित्रपट गाजलेल्या यादीत समाविष्ट आहेत. प्रेमा किरण यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ९० च्या दशकात अनेक चित्रपटांच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका वढवलेल्या आहेत.दे दणदण, धूमधडका आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  त्यांची या चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. मराठी चित्रपटसृष्टी शिवाय त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही काम केले होते. प्रेमा किरण धूम धडक (1985), मॅडनेस (2001), अर्जुन देवा (2001), कुंकू जाले...

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडी ची नोटिस ; आठवड्याभरात उपस्थित राहण्याचे निर्देश

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडी ची नोटिस ; आठवड्याभरात उपस्थित राहण्याचे निर्देश मुंबई, / वाशीम, अजय भुजबळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने  वाशीम येथील शिवसेना खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी कडून नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. असे सांगण्यात येत आहे खासदार भावना गवळी यांच्या अनुपस्थितीत, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी   अजामीनपात्र  (नॉन बेलेबल वॉरंट) वॉरंटसाठी  कोर्टात जाऊ शकते.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील मनी लाँड्रिंग प्रकरण बरेच जुने आहे. याआधीही भावनाला ईडीने नोटिस बजावले होते मात्र खासदार भावना गवळी या अद्याप एजन्सी समोर हजर झालेल्या नाहीत. त्याचवेळी त्यांना आता ईडी कडून पुढील आठवड्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यावेळीही खासदार भावना गवळी हजर न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाईल आणि त्यांंना एनबीडब्ल्यू कडून परवानगी मागता येईल अशी माहिती ईडीच्या वतीने स...

सुर्य ओकतोय आग ; देशातील बहुतांश ठिकाणी तापमान पारा ४५ वर पाच दिवस उष्माघाताचा ऑरेंज अलर्ट जारी

सुर्य ओकतोय आग ; देशातील बहुतांश ठिकाणी तापमान पारा ४५ वर पाच दिवस उष्माघाताचा ऑरेंज अलर्ट जारी IMD नवी दिल्ली, अजय भुजबळ दिवसेंदिवस ऋतुमानातील बदलामुळे , ग्लोबल वॉर्मिग सारख  संकट ओढवले जात आहे. देशातील बहुतांश ठिकाणी नागरिकांना कडक उन्हाच्या तीव्रतेने उष्माघाताच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या भेडसावत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मतानुसार तापमान अशा स्वरूपाची वाढ होते राहिली तर उत्तर, पश्चिम भारतातील काही भागात उन्हाचा तडाखा वाढ होत तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचला.  हवामान विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या माहितीनुसार गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश, मराठवाडा, दिल्ली , पंजाब, हरयाणा आणि उत्तरप्रदेश येथिल काही भागात उन्हाचा कहर वाढला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रा मध्ये ऑरेंज अलर्ट जारी. वृत्तसंस्था पिटीआय च्या रिपोर्ट नुसार हवामान विभागाने राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी वाढत्या गर्मीमुळे, ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. उत्तर पश्चिम भागात  हवामान विभागाने एक त...

तुझ माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.? (कॉंग्रेस+पीके रणनितीकार)

सर्व देशभर कॉंग्रेस नेतृत्वाच्या संबंधित चर्चा सुरू असताना. कॉंग्रेस पक्षातूनच नाराजीचा सूर उमटला होता. तो २०२० मध्ये पक्षांतर्गत असंतुष्ट गटाचा उमटलेला नाराजीचा सूर निवळत त्या असंतुष्ट गटातील नेत्यांना समावून घेण्याचा पवित्रा पक्षश्रेष्ठींना महत्वाचा मुद्दा वाटतो आहे. राहूल गांधी आणि प्रियंका गांधी विदेश दौऱ्यावर असतांना सक्रिय पध्दतीने सोनिया गांधी देशभरात विविध राज्यांतील प्रदेश पातळीवर फेरबदल करत नवनवीन नियुक्त्या करत आहेत. त्याच वेळी सोमवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकीय आव्हानांन  सामोरे जाण्याच्या दृष्टीने 'एम्पावर्ड ॲक्शन ग्रुप २०२४ ' ची निर्मिती करत रणनितीकार प्रशांत किशोर यांना सोनिया गांधीनी या मिशन कमिटी येण्याच आव्हान केले. आता तिसऱ्यांदा सोनिया गांधी बरोबर पिकेनी प्रत्यक्ष बोलणी केली तिथे पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळी आणि प्रियंका वाड्रा यांनी पुढाकारा नंतर देखील सोयरे सुतक जुळण्यापूर्विच त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आल्याची माहिती मिळते आहे.आता आपल्याला पाहणं योग्य ठरेल की बैठका वर बैठका करत असलेल्या प्रशांत किशोर आणि कॉंग्रेस मध्य...

‘द बेने मेरिटो’ पुरस्काराने खासदार छ.संभाजीराजे भोसले सन्मानीत

खासदार छ. संभाजीराजे भोसले यांना पोलंड राष्ट्रांकडून ‘द बेने मेरिटो’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्ली, अजय भुजबळ : पोलंड देशाकडून त्यांच्या देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केल्या बद्दल इतर देशातील नागरिकांना पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘द बेने मेरिटो’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी कोल्हापूर येथील छत्रपती घराण्याचे वंशज खासदार छ. संभाजीराजे भोसले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कार्यकाळात मदतीचा हात पुढे करत सहानुभूती पुर्वक आर्थिक व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देत   दुसऱ्या महायुद्धात होरपळलेल्या पोलिश कुटुंबातील लोकांना मानवतावादी आधारावर राजर्षी शाहू महाराजांनी दत्तक घेतले होते. १९४२ ते १९४९ या कालावधीत भारतामध्ये निर्वासित झालेल्या पोलंड देशातील नागरिकांच्या स्मृती प्रित्यर्थ  १४ सप्टेंबर २०१९ रोजी पोलंडचे उप-परराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते भारतात...

राणा दाम्पत्याचे पितळ उघडे पडले

राणा दाम्पत्याच्या आरोपानंतर ; आयुक्तांनी जारी केला व्हिडिओ, राणा दाम्पत्याचे खोटं जनते समोर मुंबई :  खार पोलीस स्नथानकात राजद्रोहाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा, त्यांचे पती आमदार रवी राणा यांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली असून त्यांना दलित असल्यावरून बोलले जाते, त्यांना पिण्याचे पाणी दिला जात नाही अशा प्रकारचे खळबळजनक आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. या आरोपानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत  Do we say anything more.? आम्हाला आणखी काही सांगायचं गरज आहे का अशा स्वरूपाचा मजकूर सोबत जोडला.?  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात छळ सुरु असल्याच्या आरोप केला होता. त्यात मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला, असे गंभीर आरोप केले होते. यानंतर मुंबई पोलीस आयुक्...

क्रांतीसर्य महात्मा ज्योतिबा फुले तात्यासाहेब

क्रांतीसूर्य #प्रासंगिक_जंयती_विषेश_लेख महाराष्ट्र राज्य बहुसंपन्न विविधतेने भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिक घटनांचा वारसा असलेल परिपूर्ण राज्य आहे. त्यामुळेच या महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. इथल्या समाजसुधारकांनी सामाजिक उन्नतीसाठी वैचारिक वारसा प्रदान केलेलं हे राज्य आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषता समाजातील श्रमजीवी वर्गांच्या शोषणाची व सामाजिक विकास याची मीमांसा करणारे क्रांतिकारक क्रांतीसुर्य सत्यशोधक विचारवंत समाज सुधारक महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले आहेत त्यांची आज जंयती आहे.  साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रासंगिक लेख.....! मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्विकार,निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्योत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. हा वास्तववादी विचार सन. १८ व्या शतकात निर्भिडपणे मांडून समस्त मानवजातीला सामाजिक...

"राज्यात जिल्हा सामान्य रुग्णालायत उपलब्ध खाटांची स्थिति"

नाशिक जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक खाट उपलब्धी ;  उर्वरित सामान्य रुग्णालयात कमी खाटे अभावी रुग्णांची तारांबळ  अजय भुजबळ / अमरावती ,                                           गरीब व गरजु रुग्णांना आपल्या गावात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी दुय्यम आरोग्य सेवा सर्व ठीकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने व राज्यभरात आरोग्य सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून लक्ष्य केंद्रित केले जाते मात्र कमी खाटेच्या संख्ये अभावी आणि सरकार व प्रशासनाच्या हलगर्जी मुळे राज्यातील चित्र भयावह असल्याचे लक्ष्यात येते.  महाराष्ट्र्र  राज्यात एकूण शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयांची संख्या २३ असून त्या रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या लक्ष्यात नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक खटांची संख्या ६२३ असून नाशिक हे राज्यात अव्वल दर्जाचे ठरले आहे. राज्यात इतर ठिकाणची परस्थिति लक्षात घेता ; अनुक्रमे परभणी, ठाणे, अमरावती, भंडारा  येथील जिल्हा सामान्य...

तामपमान वाढ: @अमरावती 41.1 अंश सेल्सिअस

अमरावतीत तापमानात वाढ , उन्हाचा पारा 44.1 अंश सेल्सिअसवर अजय भुजबळ  / अमरावती (५,एप्रिल) ,    अमरावती येथे    (५,एप्रिल)  रोजी सकाळ पासून उन्हाचा पारा तीव्र झल्याने अमरावती शहरवासियांना गर्मीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भात  अकोला,   अमरावती,  नागपूर, चंद्रपूर  येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उन्हाच्या झाळा तीव्र स्वरूपात  जाणवायला सुरुवात झाली आहे.  दरवर्षी  हवामानात  बदल जाणवत असतांना  तब्बल १५   वर्षानंतर पहिल्यांदा तापमाणात प्रचंड वाढ झाल्याची नोंद हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली त्या अनुषंगाणे शहरवासियांना खबरदारी घेण्याच्या  दिल्या जात आहेत. सामान्यत: मे महिन्याच्या आठवत अमरावतीत पारा ४४ अंशाच्या आसपास असतो. मात्र यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढताना जाणवत आहे . एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात ४१. १ अंशाच्या वर पोहोचला आहे. सध्या उत्तर भारतात उष्णतेच्या लाटे मूळे त्याच भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भातील तापमान वाढ ...

परभणी जिल्ह्यानं मिळवला मराठवाड्यात अव्वल क्रमांक

परभणी जिल्ह्यानं मिळवला मराठवाड्यात अव्वल क्रमांक  अजय भुजबळ / परभणी :  जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाला पिण्यायोग्य शुध्द पाणी नळाद्वारे पुरवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनानं हाती घेतला आहे.जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत जिल्ह्यातील २ लक्ष ९९हजार ७७४ घरोघरी जल जीवन मिशन अंतर्गत नळजोडणी  करून जिल्ह्याभरात पाणी पुरवठा करण्याचा मानस केंद्र सरकार चा असून आता पर्यंत या योजनेची अंबलबजावणी करण्याची सुरुवात २०१९ पासून जिल्ह्याभरात कार्यान्वित कार्याला जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व जिल्हा प्रशासनांकडून हिरवा झेंडा दर्शवला आहे. जिल्हातील एकूण ९ तालुक्यात हि योजना राबवली जाणार असल्याची माहिती जल जीवन मिशन च्या संदर्भात प्रशाशकीय संकेतस्थळावरून माहिती मिळाली आहे. जलशक्ति मंत्रालयानं सुरु केलेल्या जल जीवन मिशन परभणी जिल्हा अव्वल केंद्र शासनाच्या जलशक्ति मंत्रालयानं सुरु केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी ठरवून दिलेलं नळजोडणीचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करून परभणी जिल्ह्यानं मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे.  १५ ऑ...

महाराष्ट्रात नाशिक विभागाला भ्रष्टाचाराचा सर्वाधिक विळखा ,नागपूर येथे भ्रष्टाचाराचा कमी आकडा

  महाराष्ट्रात नाशिक विभागाला भ्रष्टाचाराचा सर्वाधिक विळखा ,नागपूर येथे भ्रष्टाचाराचा कमी आकडा    मुंबई  प्रतिनिधी / अजय भुजबळ , सरकार कडून गुन्हे आणि भष्ट्राचारचे नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र्र राज्य, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार नाशिक विभागात  सर्वाधिक गुन्ह्याची नोंद झाली असून सन. २०२२ वर्षांमधील १ जानेवारी ते ५ एप्रिल या कालावधी मध्ये अँटी करप्शन ब्युरो कडून  सापळा रचून, तसेच असंपदा व अन्य भष्ट्राच्यार या सर्व प्रकरणात नाशिक विभागात ३२ भ्ररष्टाचार गुन्ह्यांची  नोंद झालेली असून या गुह्या अंतर्गत आणि व्यतरिक्त ४७ आरोपी सापडल्याची  माहिती मिळाली आहे. त्याच्या खालोखाल औरंगाबाद   विभाग चा क्रमांक लागतो आहे. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो च्या अनुसार सर्वाधिक कमी आणि नगण्य भ्ररष्टाचा गुन्हयांची नोंद असलेला नागपूर विभाग आहे नागपूर विभागात सापळा,संपदा व अन्य भष्ट्राच्यार या सर्व संबंधित १३ गुन्हे नोंद असून, या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. लाचलुचपत विभागा कडून करण्यात येणाऱ्या क...

पाऊस आठवणींचा आणि साठवणींचा..!

त्याच्या अचानक येण्याने ती तात्पुरती बावरून गेली. आणि स्तब्ध होऊन काहीतरी विचार करत, ती जिथे उभी आहे ; तिथून गॅलरी च्या दिशेने वाटचाल करत गॅलरीत गेली.. आणि गॅलरीत स्वतःच्या आठवणींना उजळा देत त्याच्याकडे बघत बसली. कदाचित त्या आठवणींचा अनुभव सुद्धा तिने घेतला नसावा बहूधा, कारण त्याची आणि तिची भेट ऐरवी होतंच असायची ऋतुमानानुसार, पण तो आज अचानक येऊन तिच्या समोर धजावेल हे कधीच तिला अपेक्षित नव्हतं. मुळात जे अपेक्षित नसतं तेच घडतं माणसाच्या आयुष्यात ; हे उमजायला जायला वेळ लागणार होता तिला कदाचित ..! तसा तो तिच्या समोर तिच्या आठवणींचा अनं स्मरणिकेचे पूर्ण सारांश रिता करायला भाग पाडणार आणि एवढं असतांनाही ती डोळ्याची पापणी न लवता त्यांच्या सोबतीचा अर्थ बांधत बसली , तसा तेवढ्यात घरातून तिच्या नवऱ्याचा आवाज आला .. 'अगं ऐकतेस का ' - " प्रणय. हं आता काय " - शालू. असं काय विचार मग्नतेत हरवून मला जसं काही विसरूनच गेलीस..! मी काय म्हणतो तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी..? नाही म्हटलं आवाजावर पण लक्ष नाहीये..! - " प्रणय. आता मला काय झालंय धाड भरायला बरी आहे मी..! - " शालू . बर म...