सर्व देशभर कॉंग्रेस नेतृत्वाच्या संबंधित चर्चा सुरू असताना. कॉंग्रेस पक्षातूनच नाराजीचा सूर उमटला होता. तो २०२० मध्ये पक्षांतर्गत असंतुष्ट गटाचा उमटलेला नाराजीचा सूर निवळत त्या असंतुष्ट गटातील नेत्यांना समावून घेण्याचा पवित्रा पक्षश्रेष्ठींना महत्वाचा मुद्दा वाटतो आहे. राहूल गांधी आणि प्रियंका गांधी विदेश दौऱ्यावर असतांना सक्रिय पध्दतीने सोनिया गांधी देशभरात विविध राज्यांतील प्रदेश पातळीवर फेरबदल करत नवनवीन नियुक्त्या करत आहेत. त्याच वेळी सोमवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकीय आव्हानांन सामोरे जाण्याच्या दृष्टीने 'एम्पावर्ड ॲक्शन ग्रुप २०२४ ' ची निर्मिती करत रणनितीकार प्रशांत किशोर यांना सोनिया गांधीनी या मिशन कमिटी येण्याच आव्हान केले. आता तिसऱ्यांदा सोनिया गांधी बरोबर पिकेनी प्रत्यक्ष बोलणी केली तिथे पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळी आणि प्रियंका वाड्रा यांनी पुढाकारा नंतर देखील सोयरे सुतक जुळण्यापूर्विच त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आल्याची माहिती मिळते आहे.आता आपल्याला पाहणं योग्य ठरेल की बैठका वर बैठका करत असलेल्या प्रशांत किशोर आणि कॉंग्रेस मध्ये नव्यानं चौथ्या बैठकिच्या अनुषंगाने संगनमत होते का ते ; मुळात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या काम करण्याच्या पध्दती मूळे भारतीय जनता पक्षाला सत्तेवर विराजमान होण्यासाठी फायदा झाला हे सर्वमान्य झाल्याचं दिसतं. त्यानंतर भाजपा सोबत आयपॅक संस्थापक प्रशांत किशोर काडीमोड होण्याची कारणे अर्थकारणाशी असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणाली वरून देखील असू शकते. बिनसल्यावर सर्व माध्यमांसमोर पिकेनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवत खोलात न शिरता उत्तर देण्याचं टाळलं असावं. २०१५ साली पीके यांनी नितीशकुमार यांच्यासह जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न थोड्याबहुत प्रमाणात चालठकल कक्षेत यशस्वी झाला म्हणावं लागेल. ते नितीशकुमार यांच्या घरोबाचा आहेर घेऊन तिथचा पाहुणचार त्यांनी घेतला खर मात्र तिथे पण बिनसलं. तेलंगणा, बिहारमध्ये नितीशकुमार, पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांना केलेली मदत बरोबरीने इतरही काही ठिकाणी आंध्रा आणि आता काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना रणनीती यांनी दिलेला सल्ला यशस्वी ठरला. त्यामुळे पीके राजकीय वर्तुळात चर्चेचा व्यक्तिशः केंद्रबिंदू ठरतो. कॉंग्रेस आणि पिके यांच्या भेटीगाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक असतांनाच पीके कडून काही बशर्त अटी घालण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांच्या गोठ्यातून समजतं. पीकेनी पक्षाच्या नेतृत्वाच्या संबंधित बदल करत ते पद प्रियंका वाड्रा यांना द्यावे, पक्षातील नेते मंडळीचे सार्वजनिक आणि खासगी स्वरूपात ट्विटवर हॅडलिंग बदल स्वतंत्र, पक्षातील महत्वाच्या सुधारणा,निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळावे, त्याचबरोबरीने देशभरात सर्व्हेक्षण करून उमेदवार निश्चिती बाबतीत स्वातंत्र्य द्यावे या अटी उपस्थित केलेला याव्यतिरिक्त देखील काही इतरही बातचीत झाली असावी मात्र साहजिकच स्वातंत्र्य चळवळीचा १५० वर्षांचा इतिहास असलेल्या कॉंग्रेसला पीकेच्या मागण्या आणि अटी जड स्वरूपातील असल्याने ते नाकारणे पक्षाला योग्य वाटलं असावं. या घटनेत एक बाजू पाहिली तर सावधपणे दोन्ही बाजूंनी स्पष्टता ठेवत ट्विट केल्यामुळे आता पुन्हा चौथ्या बैठकिला दोन्ही बाजूंनी वाट मोकळी असल्याचं लक्षात येतं. मात्र सध्या देशातील कॉंग्रेस पक्षाची परिस्थितीत पाहता आता कॉंग्रेसने योग्य पावले उचलली पाहिजेत असं चित्र आपल्या सर्वत्र दिसून येते.
मुळात मोदींनी प्रशांत किशोर यांचे तोंड भरून कौतुक केल्यानंतर पीके यांना पक्षात सामील करून घेण्यासंदर्भात शहा आणि त्यांची बोलणी घडवून आणली होती मात्र शहा आणि त्यांच्यात बोलणी झाल्यावर प्रशांत किशोर यांना पक्षात रणनीतीकार किंवा पक्षसल्लागार होण्यासाठी डावल्यामूळे किंवा पक्षाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणात तडजोड होत नाही हा मतितार्थ संदेश त्यांना अमित शहा कडून मिळाल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. मोदींनी पक्षातील इतर देऊ केले असताना देखील पीकेनी ते न्रमपणे नाकारत माघार घेतली. अशा परिस्थितीत २०१४ नंतर पीके भारतीय जनता पक्षाच्या माघाव लागत धावपळीत आहेत. देशासमोर कॉंग्रेसच्या सोबतीने २०२४ मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते योग्य मुद्दे उपस्थित करून भारतीयला हरवण्याची पराकाष्ठा करीत असावेत आणि या निष्कर्षाअंती आता पुन्हा कॉंग्रेस आणि पिके यांच्या भेटीगाठीत काय निर्णय घेण्याचे ठरविले जाते हे पाहणं सोईस्कर ठरेल..!
- ✍️ अजय मारोतराव भुजबळ
मोबाईल नंबर .८१८०९४१२५५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा