उर्वरित सामान्य रुग्णालयात कमी खाटे अभावी रुग्णांची तारांबळ
गरीब व गरजु रुग्णांना आपल्या गावात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी दुय्यम आरोग्य सेवा सर्व ठीकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देश्याने व राज्यभरात आरोग्य सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून लक्ष्य केंद्रित केले जाते मात्र कमी खाटेच्या संख्ये अभावी आणि सरकार व प्रशासनाच्या हलगर्जी मुळे राज्यातील चित्र भयावह असल्याचे लक्ष्यात येते.
महाराष्ट्र्र राज्यात एकूण शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयांची संख्या २३ असून त्या रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या लक्ष्यात नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वाधिक खटांची संख्या ६२३ असून नाशिक हे राज्यात अव्वल दर्जाचे ठरले आहे. राज्यात इतर ठिकाणची परस्थिति लक्षात घेता ; अनुक्रमे परभणी, ठाणे, अमरावती, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४०० च्या सरासर प्रमाणे खाटांची संख्या असल्याचे दिसून येते. पुणे , जळगाव , बीड , बुलढाणा, चंद्रपूर, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ३०० पेक्षा कमी अधिक खाटांची संख्या आहे. उर्वरित राज्यभरात वाशिम ,गोंदिया, हिंगोली , सिंधुदुर्ग , नंदुरबार या जिल्हयातील रुग्णालायत २०० प्रमाणे खाटांची संख्या आहे. राज्यात ११ स्त्री जिल्हा रुग्णालये आहेत त्यापैकी नागपूर स्त्री रुग्णालायत सर्वाधिक ३५१ खाट असून उल्हासनगर येथे सर्वात कमी खाट ६६ आहेत. परभणी, बीड, जालना,उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ७६ खाटांची उपलब्धता आहे. विदर्भातील स्त्री रुग्णालय अकोला ३१६, अमरावती, गोंदिया २१६ , तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड स्त्री रुग्णालयात ११६ खाट उपलबद्ध आहेत. राज्यात रुग्णाची लक्षणीय वाढ लक्षात घेता ही रुग्णाची तारांबळ उडत असल्याचे अनेक सामाजिक आरोग्य संस्थांचे म्हणणे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा