अमरावतीत तापमानात वाढ , उन्हाचा पारा 44.1 अंश सेल्सिअसवर
अजय भुजबळ / अमरावती (५,एप्रिल),
अमरावती येथे (५,एप्रिल) रोजी सकाळ पासून उन्हाचा पारा तीव्र झल्याने अमरावती शहरवासियांना गर्मीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर,चंद्रपूर येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उन्हाच्या झाळा तीव्र स्वरूपात जाणवायला सुरुवात झाली आहे.
दरवर्षी हवामानात बदल जाणवत असतांना तब्बल १५ वर्षानंतर पहिल्यांदा तापमाणात प्रचंड वाढ झाल्याची नोंद हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली त्या अनुषंगाणे शहरवासियांना खबरदारी घेण्याच्या दिल्या जात आहेत. सामान्यत: मे महिन्याच्या आठवत अमरावतीत पारा ४४ अंशाच्या आसपास असतो. मात्र यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढताना जाणवत आहे .
एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात ४१. १ अंशाच्या वर पोहोचला आहे. सध्या उत्तर भारतात उष्णतेच्या लाटे मूळे त्याच भागातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भातील तापमान वाढ झाल्याच समजते. आणखी चार ते पाच दिवस असेच तापमान कायम राहणार असून काही दिवसांपासून वर्तवण्यात येणाऱ्या उष्माघताच्या लाटेचा अंदाज नागरिकांना जाणवत आहे. उष्मघातापासून बचावासाठी जनतेने सुती कपडे वापरावीत, तिव्र उन्हात प्रामुख्याने दूपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे. पुरेसे पाणी पित राहावे. ताक प्यावे, आणि वैयक्तिक पातळीवर खबरदारी घ्यावी असे संकेत हवामान खात्याने दिली आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा