परभणी जिल्ह्यानं मिळवला मराठवाड्यात अव्वल क्रमांक
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाला पिण्यायोग्य शुध्द पाणी नळाद्वारे पुरवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनानं हाती घेतला आहे.जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत जिल्ह्यातील २ लक्ष ९९हजार ७७४ घरोघरी जल जीवन मिशन अंतर्गत नळजोडणी करून जिल्ह्याभरात पाणी पुरवठा करण्याचा मानस केंद्र सरकार चा असून आता पर्यंत या योजनेची अंबलबजावणी करण्याची सुरुवात २०१९ पासून जिल्ह्याभरात कार्यान्वित कार्याला जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व जिल्हा प्रशासनांकडून हिरवा झेंडा दर्शवला आहे. जिल्हातील एकूण ९ तालुक्यात हि योजना राबवली जाणार असल्याची माहिती जल जीवन मिशन च्या संदर्भात प्रशाशकीय संकेतस्थळावरून माहिती मिळाली आहे. जलशक्ति मंत्रालयानं सुरु केलेल्या जल जीवन मिशन परभणी जिल्हा अव्वल केंद्र शासनाच्या जलशक्ति मंत्रालयानं सुरु केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी ठरवून दिलेलं नळजोडणीचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करून परभणी जिल्ह्यानं मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
१५ ऑगस्ट २०१९ या तारखेला ८० हजार नळ जोडणी करण्यात आल्या नंतर या पद्धतीने आज वर २,लक्ष ९९ हजार ७७४ घरानंपैकी (55.69%) 1लक्ष ,66हजार 937 घरांपर्यंत नळजोडणी चा संकल्प पूर्ण केला असून मराठवाड्यात जलस्थिची परिस्थिति सुधारत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील एकूण 78,110 अंगणवाडी तसेच प्राथमिक शालांन पैकी 22,021(74%) नळजोडणी झालेली आहे. त्या पैकी जिल्हयात एकूण आंगणवाडी व शाळा संख्या 1,692 आहे त्या पैकी १००% अंगणवाडी व शाळेत विद्यर्थ्याना शुद्ध पाणी मिळावे या साठी नळ जोडणी केली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा