शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडी ची नोटिस ; आठवड्याभरात उपस्थित राहण्याचे निर्देश
मुंबई, / वाशीम,
अजय भुजबळ
(नॉन बेलेबल वॉरंट) वॉरंटसाठी कोर्टात जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रतिष्ठान ट्रस्टमधील मनी लाँड्रिंग प्रकरण बरेच जुने आहे. याआधीही भावनाला ईडीने नोटिस बजावले होते मात्र खासदार भावना गवळी या अद्याप एजन्सी समोर हजर झालेल्या नाहीत. त्याचवेळी त्यांना आता ईडी कडून पुढील आठवड्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यावेळीही खासदार भावना गवळी हजर न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाईल आणि त्यांंना एनबीडब्ल्यू कडून परवानगी मागता येईल अशी माहिती ईडीच्या वतीने सांगण्यात येते आहे. यादरम्यान ईडी मनी लाँड्रिंगचे पुरावे न्यायालयासमोर सादर करेल.
भावना गवळी नेमक्या कोणत्या आरोपात.? :
भावना गवळी यांच्या महिला प्रतिष्ठान ट्रस्ट मध्ये १७ कोटीच्या कथित गैरव्यवहार घोटाळा प्रकरणी ईडी कडून तपास चालू आहे. काही दिवसांपूर्वी २८ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना ईडी कडून समन्स पाठवण्यात आले होते. भावना ॲग्रो एंड प्रोडक्ट सर्व्हिसेस कंपनी साठी 7.5 कोटी बैंक लोन आणि नंतर ही कंपनी खाजगी सचिवाला ७.९ कोटी ला ही कंपनी विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश सरडा यांनी केला होता.
याप्रकरणी चौकशी दरम्यान काय निष्कर्ष काढण्यात येईल हे पाहण्यासाठी रोचक ठरेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा