मुख्य सामग्रीवर वगळा

सुधीर मोघेंच्या गाण्यातील आशावाद मतितार्थ- माझा दृष्टिकोन..!

गीतकार सुधीर मोघेंच्या गाण्यातील आशावाद, मतितार्थ- माझा दृष्टिकोन..!

परिवर्तन एक शोध - द्वारे प्रकाशित 
अंतिम सुधारित -२० जुलै २०२२
© अजय मारोतराव भुजबळ 


आजच्या स्थितीत माणसांचं जगणं सुकर आणि  सोईस्कर नक्कीच झालेलं आहे. मात्र त्याच बरोबर तुलनेने निराशाजनक वातावरण आणि निराशेच्या गर्तेत माणूस वारंवार गुंतत जातो आहे. त्यामुळे निराशा, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध असतात त्यातील एक एक सहजपणे सांगितला जातो तो मार्ग म्हणजे संगीत ऐकणे.! 
होय अगदी बरोबर वाचले आहे तुम्ही, संगीत ऐकणे, बरोबर नाही का.? तर याच विषयाला अनुसरून मी लिहिलेल्या ; गीतकार सुधीर मोघेंच्या गाण्यातील आशावाद, मतितार्थ- माझा दृष्टिकोन..! या लेखातून आपणांस सकारात्मक दृष्टिकोन आणि उर्जा मिळो हीच अपेक्षा..! 

जेष्ठ कवी, गीतकार, निवेदक, संगीत दिग्दर्शक, सुधिर मोघे माहिती आहेत ना..? तुम्हाला माहिती असो किंवा नसो त्यांची गाणी तुम्ही नक्कीच ऐकलेली असणारं हे मात्र निश्चित बरंका..! आणि हो ज्यांना सुधिर माहीती नाही त्यांनी नक्कीच माहिती करून घ्यायला हवं या व्यक्तीमत्त्वाबाबत आणि त्यांच्या गीतांबद्ल सुध्दा...! कारण शब्देच्या दुनियेत त्यांचा हस्तक आणि त्यांची शब्दावरील, पकड, जबरदस्त येवढेच होते.

आता थोडंसं त्यांच्याबद्दल राहवत नाही म्हणून सांगूशच टाकतो. त्यांचा जन्म पुण्यात किर्लोस्करवाडी मध्ये झालेला. किर्लोस्कर कंपनी मध्ये नोकरी करत असताना "स्वरानंद संगीत प्रतिष्ठान" ची स्थापना केली. ज्यांनी ५० अधिक चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे.त्याच बरोबर अनेक प्रसिद्ध भावगीते, भक्तीगीते लिहलेली आहेत. आणि अनेक चित्रपटांच्या, रंगमंचावरील कार्यक्रमाच्यासाठी निवेदन, संकल्पना, स्क्रिप्ट त्यांनी लिहल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात त्यांच्या या कार्याची दखल घेत शासकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गैरवण्यात आलेलं आहे.

सध्या त्याचं एक गाणं ऐकलं आणि मग अधिक खोलवर विचार करत त्यांनी शब्दबद्ध केलेली गाणी ऐकत बसलो, आणि विचार आला किती काय शिकवून जातात त्यांच्या गाण्यातील एक ना ओळ, आणि एक ना शब्द. मग एक गाणं प्रेम आशाय कथन करणारे होते त्यातील ओळी ऐकून वाटलं , आताच्या घडीला तरी संसराचे वगैरे काहीचे सांगुच शकत नाही .. पण त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू, मग सुधिर मोघेच्या त्या एका गाण्यातील दोन ओळी.. आणि आयुष्यात आशावादी बनवतात अशी काही सुंदर शब्दांत गुंफलेली रचलेली गीत आणि तितकीच गोड आवाजात पार्श्वगायकांनी गालेली काही गाणी यांचा शोध घेत राहिलो आणि या विषयावर व्यक्त व्हायला असं वाटलं म्हणून हा सारा प्रपंच आपल्या समोर मांडतो आहे..!

१. "दिस जातील , दिस येतील भोग सरलं सुख येईल..!" (फक्त दोन ओळी सध्यासाठी तरी) हे गीत 'शापित' चित्रपटासाठी सुधीर मोघे द्वारा लिखित असून , याला संगीत दिले आहे सुधीर फडके यांनी, आणि आपल्या गोड गळ्याच्या साह्याने स्वरबद्ध केलेले आहे अशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

२. "येगळी माती आता गं येगळी दुनिया, आभालाची माया बाई तरी इ किमया,  फुलल बाई पावसानं मुलुख सारा- या दोन ओळी रचनेचा विषय संदर्भ सोडून सुध्दा आशावाद आणि दुनियादारी बदल शिकवणं देऊन जातात" 
(गीत - आला आला वारा ) हे गीत हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील सुधीर मोघे द्वारा लिखित असून , याला संगीत दिले आहे  पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि आपल्या गोड गळ्याच्या साह्याने स्वरबद्ध केलेले आहे अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी. 

३. फिटे अंधाराचे जाळे - या गीताचे बोलच सांगुन जातात की आयुष्यात किती हि निराशाजनक वातावरण निर्माण झाले असेल, अंधार दाटून आला असेल तर नक्कीच एक ना एक दिवस अंधाराचे जाळे फिटणार असते आणि नवीन पहाट, नवीन दिवस उजाडणार असतो त्यामूळे निशारा निवारण करण्यासाठी आपण झटपट करत राहणं गरजेचं आहे. आणि आपण हसत हसत जगत राहिले पाहिजे संयम, शांतता कायम टिकून ठेवण्यासाठी..!
 "मनामध्ये निराशेचं धुकं साचलं, की आठवून ताजंतवानं व्हावं आणि सारं वातावरण स्वच्छ, सुंदर भासू लागावं असं चिरतरूण गाणं म्हणजे ‘फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.’
बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि आशाताईंच्या युगुलस्वरातलं हे गाणं श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेला हा पहिला सिनेमा. त्याचं नाव ‘लक्ष्मीची पाऊले.’ बाबूजींनी श्रीधरजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं हे पहिलं गाणं. संगीतकार ‌वडिलांनी आपल्या संगीतकार मुलाकडून हे गाणं शिकून घेतलं आणि आशाताईंसोबत उत्कटपणे भावपूर्ण गाऊन अजरामर केलं."


४. हे जीवन सुंदर आहे - जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकांचा वेगवेगळ असतो मात्र आपण एक गोष्ट  कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे खरोखरच हे जीवन सुंदर आहे.  चौकट राजा या चित्रपटातील हे गीत आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं असून या गीताला आशा भोसले, रविंद्र साठे, अंजली साठे यांनी स्वर दिले आहेत.

५. एक झोका चुकवे काळजाचा ढोका - भिन्न अर्थी तुम्ही या गीताचा जसा अर्थ लावाल तसा लागतो. "आता हिच ओळ बघा ना - नाही कुठे थांबायचे, मागे पुढे झुलायचे 
(आपलं काम चोख चालूच राहु द्यायचं, आयुष्यात उंच भरारी घ्यायची.!)"  गीतकार : सुधीर मोघेसंगीतकार आनंद मोडक, गायक - आशा भोसले, चित्रपट  चौकाट राजा


६. हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिषाप भोगतो हा. - 
आता ह्या ओळींचा अर्थ लावून बघा .. मी वेगळा अर्थ लावून बघितला तो म्हणजे आयुष्यात कोणीच स्वयंभू नसतो कुणाला ना कुणाचा आधार घ्यावा लागतो, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कसला ना कसला तरी अभिषाप असतोच दडलेला.  - गीत- रात्रीस खेळ चाले, 
चित्रपट- 'हा खेळ सावल्यांचा' , संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वर - महेंद्र कपूर 

६. जिवनात बेभान, होऊन जीवन जगायचं असतं कधी कधी लाज सोडून जगायचं असतं,  ठेच लागली तरी चालायचं असतं- गीत- घुंगरू तुटले रे, जानकी चित्रपटातील गीत, गायन कोकीळा लता दीदी यांनी स्वरबद्ध केले आहे. 

या पद्धतीचे सुधीर मोघेंनी रचलेली अनेक गीते आहेत जी आशावाद प्रकट करतात जगण्याला उमेद देतात जीवन सुखकर, सुसह्य, आनंदी बनवतात त्यामुळे मराठी संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण सकारात्मक ठेवून आपल्याला काय आत्मसात करता येईल.? या गोष्टीचा विचार केला पाहिजे या पद्धतीचे अनेक गीत मी ऐकून विश्लेषित करू शकलो असतो मात्र शब्दांची मर्यादा आणि इतर सगळी माहिती जुळवा जुळव करताना कठीण जात आहे आणि ते कठीण आहे म्हणून मी सोडून देत नाहीये तर आपण सुद्धा हे वाचावं आणि मला सुचवावं की आपल्याला कुठले याव्यतिरिक्त सुधीर मोघे यांचे गीत माहिती आहेत का ज्याच्यातून आशादायी , जीवन जगण्यासाठी तुम्ही प्रेरित होता..? तर नक्की कमेंट करा, शेअर करा सबस्क्राईब करा.!

© अजय मारोतराव भुजबळ
मो.नं. 8180941255
(लेखक संगीत रसिक आहेत त्याच बरोबर , सध्या मुक्त पत्रकार आहेत. व केंद्र सरकारच्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थान येथून उत्तीर्ण आहेत.) 




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...