महात्मा ज्योतिबा फुले यांनी माणसाला आत्मभान जागृत ठेवण्याची शिकवण दिली - प्रा यादव
Written by : © Vatsaru Of words /
परिवर्तन एक शोध टीम
November 29, 2022 10:15:54 Pm
सेलू , जि.परभणी / प्रतिनिधी :
माणसाचा तर्क जागृत करणारे शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिले. माणसाणं खऱ्याचा अट्टाहास आणि खोट्याचा धिक्कार करायला शिकले पाहिजे. असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आर.एस. यादव यांनी केले शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद सेलूच्या वतीने सोमवारी दि.२८ रोजी नुतन विद्यालयाच्या कै. रा.बा.गिल्डा सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.खऱ्या सामाजिक परिवर्तनासाठी सामाजिक संवेदनशीलता जोपासत माणसाने सद्सद्विवेक बुद्धी जागृत विज्ञानवादाचा अंगिकार करणारे शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. असं सांगून प्रा.यादव यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण, कृषी , साहित्य धर्मचिकित्सा, इत्यादी पैलूंचा आढावा घेतला. महात्मा फुलेंनी स्त्रीयांना माणुसकीचा अधिकार देऊन माणसांना आत्मभान जागृत ठेवण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी शिकवण दिली. असेही यावेळी ते बोलतांना म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव बोबडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर इंगळे हे उपस्थित होते. यावेळी सुंदरलाल सावजी बॅंक जिंतूरच्या वतीने जिल्हा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब पवार यांनी केले. तर सुत्रसंचलन भारत मोगल यांनी केले. आभार प्रदर्शन लखन उगले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामराव गायकवाड, राजेंद्र हारसुरे, पांडुरंग मांगदूरे, डॉ काशिनाथ पल्लेवाड, माधव गव्हाणे, सुरेश हिवाळे, पांडुरंग मुसळे, रमेश नखाते आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा