महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची खूशखबर, या मार्गांवर धावणार 18 विशेष गाड्या, तपासा तपशील.....
Indian Railways Special Trains : डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य रेल्वे 18 विशेष गाड्यांसह 12 उप-शहरी ट्रेन चालवणार आहे. Written by : © Ajay Bhujbal परिवर्तन एक शोध टीम / नई दिल्ली Published: December 05, 2023 21:30 PM (IST) Indian Railways Special Trains : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) ने महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वे विभागाकडून सुचना प्रसारित करण्यात आली आहे, ज्या मध्ये प्रवाशांना कळवण्यात आले आहे की - 6 डिसेंबर रोजी 18 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 12 अतिरिक्त लोकल सेवा चालवल्या जातील. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी दरवर्षी ६ डिसेंबर हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर दादर आणि मुंबईतील इतर स्थानकांवर रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) चे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध ठिकाणांहून लोकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी, मध्य रेल्वे मंगळवार आणि बुधवारी 12 अतिरिक्त उपनगरी स...