जम्मू-काश्मीर येथे पार पडलेल्या सम्बो कुस्ती स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी रचला नवा इतिहास
जम्मू काश्मीर/ ६ डिसेंबर :
जम्मू काश्मीर येथे इंटरनॅशनल फेडरेशनच्या वतीने तीन दिवसीय सॅम्बो चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २८ राज्यातून या स्पर्धेत एकूण ७८५ सॅम्बो कुस्तीपटू खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ९ वर्ष वयोगट ते ३५ वयोगटातील स्पर्धकांमध्ये, दि. २ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२२ रोजी ही कुस्ती स्पर्धां पार पडली. महाराष्ट्रातील नाशिक,अहमदनगर, पुणे, सोलापूर, नागपूर, वाशिम, औरंगाबाद, तसेच परभणी या आठ जिल्ह्यांतील २८ खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. अलिबाग कुस्ती केंद्र परभणी येथील कुस्ती मल्लांनी आपल्या डावपेचांची समोरच्या प्रतीस्पर्धी खेळाडूंना खारद करत या स्पर्धेत यशस्वी वाटचाल गाठली.या स्पर्धेत परभणीच्या पाच कुस्ती खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले.५३ वजनगटातून
(गोल्ड) सुवर्णपदकाचा मानकरी - अमर राजू हरणे, विशाल प्रकाश बालटकर, आर्यन लक्ष्मीकांत ऋतुराज, तसेच ७० वजन गटातून
कांस्य (ब्रॉंज ) पदक - ऋषी तुकाराम मुळे, सोहम राजेश पारडे, यांनी पटकाविले. या यशाबद्दल सर्व स्तरातून परभणीच मल्लांचे कौतुक होत आहे. मल्लांना तालमीची शिकवण देण्यामध्ये (कोच) वस्ताद जुनेद खॉंन पठाण यांनी खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीबद्दल आंनद व्यक्त करत त्यांचे कौतुक व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा