"ग्लोबल आडगाव या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड"
Written by : © Vatsaru Of words /
December 12, 2022 01:22:54 Pm
मुंबई/प्रतिनिधी :
सिल्व्हर ओक फिल्म्स ॲन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत मनोज कदम निर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित बहुचर्चित मराठी चित्रपट "ग्लोबल आडगाव" ची निवड कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. 15 ते 22 डिसेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या महोत्सवात "ग्लोबल आडगाव " चित्रपटाचे प्रदर्शन 20 डिसेंबर रोजी नंदन प. बंगाल सेंटर, गर्छनमेंट ऑफ वेस्ट बंगाल, 1/1, जगदिशचंद्र बोस रोड, कलकत्ता येथे प्रदर्शन होणार आहे.
"ग्लोबल आडगाव" या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिलकुमार साळवे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी शिरमी व 15 ऑगष्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातील लेखनाबद्दल अमेरिकेचा महाराष्ट्र फाउंडेशनचा रा. शं. दातार पुरस्कार मिळाला आहे, तर 15 ऑगष्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. 15 ऑगस्ट ला भारतातील सर्वात प्रतिष्ठेचा 'दादासाहेब फाळके', प्रभातचा व्ही. शांताराम बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर अवार्ड, केरळ, दिल्ली, राजस्थान, बेंगलोर यासह 191 राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्व्हर ओक फिल्म ॲन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माते मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित "ग्लोबल आडगाव" हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला असून या चित्रपटाची निवड कलकत्ता अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. कलकत्ता अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येतो. येथे आजपर्यंत अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शहा, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन, नवाजोद्दीन सिद्दीकी, सुभाष घई यासह असंख्य महान कलाकार व चित्रपटकत्यांनी हजेरी लावलेली आहे.
ग्लोबल आडगाव" चित्रपटाचे दोन प्रिक्यु पूणे व मुंबईत झाले. समिक्षकांनी भरभरून तारीफ केली. या चित्रपटात शेती, मातीत राबनाया, रापलेल्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गाव जीवनाचं भव्य व उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा म्हणी व नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग व आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या व विनायक पवार, प्रशांत मडपुवार, अनिकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. "ग्लोबल आडगाव" म्हणजे शेती, मातीतल्या पिढ्यांची जिवघेणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भीतींना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच "ग्लोबल आडगाव" आहे.
या कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 3000 चित्रपटातून 14 भारतीय चित्रपट निवडले. त्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ "ग्लोबल आडगाव" या मराठी चित्रपटाची निवड झालेली आहे.
या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कानगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णु भारती, ऋषीकेष आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे, विष्णु चौधरी, रामनाथ कोकाटे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहे. इ.पी. प्रशांत जठार, प्रॉडक्शन मॅनेजर सागर देशमुख, छायांकन गिरिष जांभळीकर, संगीत विजय गवंडे, साउंड विकास खंदारे, आर्ट संदिप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डिआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड यांचे असून डॉ. सिद्धार्थ तायडे, प्रदिपदादा सोळंके, दिलीप वाघ, गणेश डुकरे, वैदेही कदम, स्नेहल कदम, गणेश लोहार, मंगेश तुसे, संतोष गोरे, यशपाल गूमलाडू, मधुकर कर्डक, प्रियंका सदावर्ते, प्राजक्ता खिस्ते, जगदिश गोल्हार, सुशील डायगव्हाणे, जितेंद्र सिरसाट, प्रशांत तालखेडकर, अनुराधा प्रकाश, राहुल कांबळे, अक्षय गायकवाड, मनिष खंदारे, सचिन गेवराईकर, स्वप्नील खरात, अमृता मोरे, मयंक सिरसाठ, केरे महाराज, आदित्य केरे, प्रतिक्षा गोरे, अरूण गाडे, अभिजीत काठे, भगवान राऊत, रूपेश पासफुल, ज्ञानेश्वर हरींबकर, डॉ. सतिश म्हस्के, प्रेरणा खरात, विद्या जोशी, रानवा गायकवाड, सागर पतंगे, व्यंकटेश कदम, अश्वजीत कदम, नानासाहेब कर्डीले, सोनल मंर्चडे, सुधीर श्रीराम, स्वप्नील काळे, डॉ. उंडनगावकर, राजेश वाढोरे, योगेश लम्हणे, युवराज साळवे, सुदर्शन कदम, अरविंद हमदापूरकर, धानुवा नागटीळक, अमोल पानबुडे, प्रकाश जावळे, प्रशांत जाधव, चैताली जाधव, अकांक्षा हमदापूरकर, साई महाशब्दे, आशिर्वाद नवगिरे यांच्या भूमीका आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा