हिमाचल प्रदेश : मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पराभव स्वीकारत, काँग्रेसचे अभिनंदन केले
Written by : © Vatsaru Of words /
December 8, 2022 03:42:54 Pm
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभव स्वीकारत काँग्रेसचे अभिनंदन केले असून आपण राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, "मी जनतेच्या जनादेशाचा आदर करतो आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचा आभारी आहे की आम्हाला पाच वर्षे हिमाचल प्रदेशची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आम्हाला प्रत्येक पाऊलावर त्यांचे समर्थन मिळाले."
“विरोधकांना सत्ता मिळण्याची शक्यता जवळ आली आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करतो. मी हिमाचल प्रदेशातील सर्व जनतेचे विशेषत: मतदारांचे अभिनंदन करतो कारण त्यांनी निवडणूक प्रक्रियेत खूप सहकार्य केले आहे. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही, जनतेने मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला. अतिशय उत्साहाने. यावेळी हिमाचल प्रदेशात विक्रमी मतदान झाले."
"हिमाचल प्रदेशात प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे आणि साहजिकच त्याचे श्रेय आदरणीय मोदीजींना जाते."
"मी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानतो , त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो, या निवडणुकीसाठी त्यांचेही खूप सहकार्य होते. मी अमित शाहजींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो."
"मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण करावीत. आमचे सहकार्य नेहमीच राजकारणाच्या पलीकडे देखील राहील जेणेकरून हिमाचल प्रदेश पुढे जाईल. जिथे हिमाचलच्या हिताचे नीट रक्षण केले जात नसेल तेथे ; विधानसभेच्या आत आणि बाहेर सत्ताधाऱ्यांना विरोधाचा सामना करावा लागेल.
भूपेश बघेल यांच्या वक्तव्या नुसार जयराम ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ; पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री जयराम यांना विचारले की भाजपा काहीही करू शकते असे बघेल म्हणत आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे. तेव्हा जयराम म्हणाले की, "आपल्याला मिळालेल्या जनमताचे रक्षण करणे हे त्याचे काम आहे."
शेवटी ते म्हणाले की, मी काही वेळातच माझा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे.
In Himachal Pradesh, Congress wins 35 seats, leading in 5 seats; BJP wins 18 seats & is currently leading in 7 seats as counting continues. pic.twitter.com/pXxpHCZ8cW
— ANI (@ANI) December 8, 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा