उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाला मशाल चिन्ह मिळालवर ; जनसामान्य वर्गातून , अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ..! ह्या सुरेश भट यांच्या ओळी सोशल मीडिया वर प्रतिक्रियेच्या रूपात धुमाकूळ घालत आहेत.
Written by - परिवर्तन एक शोध टीम
Updated: October 10, 2022 00:19:54 Am
Follow Us : Koo App भारतीय ट्वीट
फेसबुक इंस्टाग्राम Youtube
पुणे : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच नाव तात्पुरत गोठवण्यात आल्याने अंधेरी पोट निवडणूकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटांकडून नवीन चिन्ह आणि नवीन नावे निवडणूक आयोगाकडे सुचवण्यात आली होती. यावर आता आयोगांनी निर्णय दिला असून उद्धव ठाकरे यांना 'मशाल' चिन्ह मिळालं असून शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आहे.
तर शिंदे गटाला नवीन तीन पर्यांय सुचवायला सांगितले असून बाळासाहेबांची शिवसेना असे नाव त्यांना दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या 'मशाल' या चिन्हावरून सोशल मीडियावर उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कवितेच्या ओळी अनेकांच्या तोंडून गुणगुणली जावू लागली आहे.
उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.. सुरेश भट यांची ही कविता सिंहासन या मराठी चित्रपटात स्वरबद्ध करण्यात आलं होती. या चित्रपटातून देखील राजकारणाचं वास्तव दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात मुख्य भूमिका ही निळू फुले यांनी साकारली आहे. यामुळे सध्याच सुरू असलेलं राजकारण बघता ठाकरेंना हे चिन्ह मिळाल्यावर अनेकांच्या तोंडून नकळतपणे हे गाणं येत आहे. तर अनेक शिवसैनिकांनी या कवितेच्या ओळी आणि गाण्याच्या रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
हे गाण भावनिक असून थेट काळजाला भिडणार असल्याने हे गाणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचार गित म्हणूनही वापरलं जावू शकत,अशी शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाला तीन नावे आणि चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील निवडणूक आयोगाला तीन नावे आणि तीन चिन्हे सादर करण्यात आली होती. यामध्ये शिंदे यांनीही ठाकरे यांच्याप्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली होती. तर तिसरा पर्याय म्हणून गदा देण्यात आली होती. नावातही शिंदे यांनी बाळासाहेबांचे नाव दिले होते. त्यामुळे कोणते नाव कुणाला मिळते, याबाबत उत्सुकता लागली होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचे तीन पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची या नावांचा समावेश होता त्यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव त्यांना मिळालं आहे. तर शिंदे यांनी निवडणूक चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले होते त्यापैकी कुठलेही चिन्ह त्यांना मिळालं नसून नवीन चिन्ह सुचवायला सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा