गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवप्रेमी बांधवांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली आहे.
Written by - परिवर्तन एक शोध टीम
Updated: October 9, 2022 10:19:54 pm
Follow Us : Koo App भारतीय ट्वीट
गुगल आणि विकिपीडियावर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा समुद्री चाचे असा उल्लेख केल्याने शिवभक्त संतापले आहेत. याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर विकिपीडियावर दुरुस्ती करण्यात आली आहे. गुगल आणि विकिपीडिया हे दैनंदिन माहिती मिळण्याचे स्त्रोत समजले जातात. जगभरातील माहिती गोळा करण्यासाठी या दोन माध्यमांची मदत घेतली जाते. मात्र गुगल वर कान्होजी आंग्रे हा शब्द सर्च केल्यानंतर तिथे कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख पायरेट्स अर्थात समुद्रीचाचे असा करण्यात आल्याचं रविवारी दिसून आलं यानंतर याच्या समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात समुद्र किनारी Nevy मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून सारखेल कान्होजी राजे आंग्रे यांना ओळखले जाते. ब्रिटिश डच पोर्तुगीज यांची अनेक आक्रमण त्यांनी परतावून लावली. भारतीय नौदलाकडून त्यांना मेंटोर म्हणून बघितले जाते. अशा कान्होजी राजे आंग्रे यांचा उल्लेख गुगलवर समुद्रीचाचे असा केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमींनी यावर आक्षेप नोंदवला असून यासाठी एक मोहीम सुरू केली आहे.
हिंदवी स्वराज्याच्या नौदलाचा प्रमुख सरखेल, अठरा किल्ले आणि सलाना दोन कोटी महसूल आलेल्या भू भागाचा कर्तुम अकर्तुम अधिपती. किमान अडीचशे गलबत, गुराब, मचवे, फ्रिगेट चे दल बाळगणारा सेनानायक. ज्याच्या शिक्क्याच्या “दस्तका” शिवाय इंग्रज – पोर्तुगीज आदी पश्चिमी सत्तांचे एकही जहाज पश्चिम सागर भ्रमण करु शकत नव्हते असा सागराधीपती. ज्याने एकहाती इंग्रज आणि पोर्तगीज यांचा सागरी उन्माद उधळून लावत मराठा जरी पटक्याचा दरारा सागरावर प्रस्थापित केला, अशा विराचे पायरट हे वर्णन समस्त भारतवासीयांच्या करीता अपमानास्पद आहे. यावर आक्षेप नोंदवणे गरजेचं आहे.
– रघुजीराजे आंग्रे कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज
आक्षेप कसा नोंदवाल
गुगलवर जायचं, कान्होजी आंग्रे सर्च करायचं- त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर जिथे हे pirate लिहिलेलं दिसतंय त्या पुढे उजव्या कोपऱ्यात ३ : उभे डॉट्स असतील त्यावर क्लिक करुन incorrect असा फीडबॅक नोंदवा असे आवाहन शिवभक्तांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा