मुख्य सामग्रीवर वगळा

थेट CM एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले ; तरूणाने सुनावले खडे बोल.....

एकनाथराव, तुम्ही लय मोठं पाप केलंय.... !
   
Written by - © लेखक - प्रेमकुमार बोके 
 परिवर्तन एक शोध टीम 
Updated: October 11, 2022 01:12:54 Pm
Follow Us : Koo App भारतीय ट्वीट
फेसबुक इंस्टाग्राम Youtube 


प्रति, 
मा.एकनाथराव शिंदे,
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री 

                    तुम्ही सध्या जरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ असले तरी तुम्हाला मुख्यमंत्री मानायला महाराष्ट्राची जनता अजिबात तयार नाही.कारण खरी शिवसेना आमचीच आहे हा स्वार्थी अट्टाहास धरुन तुम्ही जे आकांडतांडव केले होते,त्याच शिवसेनेचे नाव आणि चिन्ह तुमचा वापर करुन काही लबाड लांडग्यांनी गोठवण्याचा नीचपणा केला आहे.आता तुम्हालाही शिवसेना हे नाव वापरता येणार नाही व धनुष्यबाणही मिळणार नाही.त्यामुळे *याचसाठी केला होता का अट्टाहास !* अशी तुमची निर्भत्सना उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे.फक्त एका पदासाठी आयुष्यभराची प्रतिष्ठा,सन्मान आणि इज्जत तुम्ही गमावून बसला आहात.ज्या शिवसेनेने तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला सर्वच काही दिले आणि मुख्यमंत्री पद सुध्दा तुम्हालाच देणार होते.पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना उध्दवजी पाहिजे होते म्हणून तुम्हाला ते पद मिळू शकले नाही.म्हणजे सर्वच काही मिळाल्यावरही जर तुमची महत्वाकांक्षा अघोरी आणि अमानवी रुप धारण करीत असेल तर तुम्ही फक्त पदांसाठी शिवसेनेत होते व तुम्हाला शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत  काहीच घेणेदेणे नव्हते असेच म्हणावे लागेल.

                          एकनाथराव, तुम्ही अणाजीपंताच्या कुटील कारस्थानाला बळी पडले आहात.अणाजीपंतांनी छत्रपती संभाजीराजांना सुध्दा कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले होते.परंतु संभाजीराजांनी शरणागती न पत्करता स्वराज्यासाठी हसत हसत आपल्या प्राणाचे बलिदान दिले.संभाजीराजांच्या अपमानामुळे या मराठी मुलुखातला प्रत्येक माणूस त्वेषाने असा काही पेटून उठला की औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली.आजही तुमच्या बेईमानीमुळे महाराष्ट्राच्या गावखेड्यातील प्रत्येक माणूस अतिशय संतप्त झाला आहे.बस,रेल्वे,आॕटोरिक्षा आणि चौकाचौकात तो तुमच्या गद्दारी बद्दल आणि अणाजीपंताच्या कपटाबद्दल अत्यंत संतापाने आणि रागाने बोलत आहे.आता सर्व मतभेद आणि पक्षभेद विसरुन या महाराष्ट्रात तुम्हा दोघांची राजकीय कबर बांधून महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या अस्सल व पवित्र भगव्याचे राज्य निर्माण करण्याचा विडा मराठी माणसाने उचलला आहे.आता छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या विचारांची जीवंत व ज्वलंत *मशाल* तुमचे विकृत व विद्रुप मनसुबे जाळल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा.

                   त्यामुळे उध्दवजींच्या पक्षाला आता नाव,चिन्ह कोणते मिळाले याला फारसे महत्व राहिलेले नसून फक्त आणि फक्त गद्दारांना आणि कपटी अणाजीपंताला त्यांची लायकी दाखवून त्यांचे थडगे बांधणे एवढा एकच विषय महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात घोंघावत आहे.मराठी माणूस संतापाने एवढा पेटून उठला आहे की,तो फक्त आता निवडणूकीची आतुरतेने वाट पाहत आहे.तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचा *धनुष्यबाण* चालला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेली *शिवसेना* तुम्हाला चालली नाही.त्यामुळे तुम्ही प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांचे कट्टर शत्रू आहे व शिवरायांच्या शत्रूच्या गोटात सामील होवून मराठी मन,माणूस आणि मातीसोबत गद्दारी केली आहे.या अपमानाचा बदला मराठी माणूस घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा.चाळीस पैकी चारही आमदार निवडून येणे कठीण होणार आहे आणि अणाजीपंत तुमच्या मुर्खपणावर मनातल्या मनात दुष्ट व कुत्सित भावनेने हसणार आहे.मराठी माणसांच्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरले असून तुम्ही सर्व काही गमावून बसले आहात व एक गद्दार म्हणून तुमाची इतिहासात कायमची नोंद झाली आहे.

                     एकनाथराव, आम्ही संभाजी ब्रिगेडचे लाखो मावळे उध्दव साहेबांसोबत खंबीरपणे सोबत उभे आहोत.संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आक्रमक वक्त्यांच्या तोफा जेव्हा या महाराष्ट्रात गरजायला सुरुवात होईल,तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल.आम्ही प्रबोधकारांच्या विचारांचे वारसदार आहोत.उध्दव साहेब प्रबोधनकारांचे नातू आहेत.या संकटाच्या काळात आम्ही प्राणपणाने त्यांना साथ देवून तुमचा नीचपणा महाराष्ट्राच्या घराघरात सांगणार आहोत.सेना-ब्रिगेड युती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिल्याशिवाय शांत राहणार नाही हे लिहून ठेवा.शिव-शंभू सैनिक आता तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही.औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगाला शिवरायांवर स्वारी करण्यासाठी पाठवले होते.पुरंदरच्या तहात महाराजांना अनेक किल्ले गमवावे लागले,पण निष्ठावान मावळ्यांच्या ताकदीवर शिवरायांनी पुन्हा उसळी घेतली आणि दुपटीने किल्ले हिसकावून घेतले.शेवटी जयसिंगाला औरंगजेबाने विष देवून ठार मारले.आपल्या बहिणीचा नवरा असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांसोबत स्वार्थापोटी गद्दारी करुन मोहम्मद घुरीला मदत करणाऱ्या जयचंद राठोडलाही घुरीने नंतर मारुन टाकले.त्यामुळे गद्दारांना कुठेच स्थान नसते.शेवटी त्यांचा अंत हा फार भयानक होत असतो.त्यामुळे एकनाथराव तुम्ही अणाजीपंताच्या जाळ्यात फसले असून हा अणाजीपंत तुमचे राजकीय आयुष्य उध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही.ज्या माणसाने आपल्याच पक्षातील मोठमोठया नेत्यांचे राजकीय जीवन बरबाद केले,ती व्यक्ती तुम्हाला काय चांगली वागणूक देणार ?  एकनाथराव, तुम्ही महाराष्ट्राच्या मराठी मनाला फार वेदना दिल्या असून तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.तुमच्या हातून लय मोठं पाप घडलं एकनाथराव.....!

© - प्रेमकुमार बोके 
अंजनगाव सुर्जी 
९५२७९१२७०६ 
११ आॕक्टोबर २०२२
 (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतीदिन)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्याचा अमृतकाळ: महापुरुषांचे विचार आणि विकसित भारताचा संकल्प

  79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी , स्वातंत्र्य समता बंधुता मानवी मूल्यं म्हणून शाश्वत विकास क्रांतिकारकांचे योगदान महापुरुषांचे योगदान, सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करून दिवा पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ता अजय भुजबळ त्यांनी लिहिलेला हा सविस्तर लेखाजोख... आवर्जून वाचावे आणि विचार करायला प्रवर्तक ठरणारा लेख..! स्वातंत्र्याचा अमृतकाळ: प्रगतीचे चित्र आणि वास्तवाचे रंग आज, १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा तो एक भव्य सोहळा आहे. गेल्या ७८ वर्षांत भारताने अनेक आव्हानांवर मात करून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. ही निश्चितच एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, याच वेळी एक प्रश्नही आपल्याला अस्वस्थ करतो: जर आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होत असेल, तर जागतिक 'हॅपीनेस इंडेक्स' मध्ये आपण इतके मागे का आहोत? याचे उत्तर केवळ आर्थिक आकडेवारीमध्ये नाही, तर आपल्या महापुरुषांनी जोपासलेल्या सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांमध्ये ...

फुले (हिंदी चित्रपट) : क्रांतीसुर्य, युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न.?

फुले: युगपुरुषाच्या तेजाला झाकोळण्याचा प्रयत्न? अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय मोठ्या प्रेक्षकवर्गाला करून देण्याच्या उद्देशाने बनवला गेला असेल यात शंका नाही. तथापि, चित्रपट पाहताना अनेक ठिकाणी इतिहासाचे चुकीचे चित्रण आणि व्यक्तिरेखांची कमतरता जाणवते, ज्यामुळे एका थोर समाजसुधारकाला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटते. चित्रपटातील जोतीबा फुलेंची व्यक्तिरेखा अत्यंत कमजोर आणि आत्मविश्वासहीन दाखवण्यात आली आहे. इतिहासातील जोतीबा हे सधन कुटुंबातील, जिद्दी, करारी आणि आपल्या विचारांवर ठाम विश्वास असणारे होते. त्यांनी समाजातील रूढीवादी विचारसरणीला जोरदार टक्कर दिली. ‘सत्यशोधक’ आणि ‘महात्मा फुले’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे कणखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व या चित्रपटात पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. ‘फुले’मधील जोतीबा सतत मार खाणारे, शांत बसणारे आणि थकलेले दिसतात. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. एका युगपुरुषाचे हे चित्रण निराशाजनक आहे. दुसरीकडे, सावित्रीबाई फुलेंची व्यक्तिरेखा अधिक प्रभावी आणि पुरोगाम...

राहुल गांधींना छातीत गोळी घालून मारू : भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव

भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींना दिली जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने गृहमंत्री अमित शहांना लिहिले पत्र नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम: Written by : © Ajay Bhujbal   परिवर्तन एक शोध टीम / Drishti Promoters   Published: September 29, 2025 16:10 PM (IST) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनलवरील थेट चर्चेदरम्यान (Live Debate) जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेनंतर काँग्रेस पक्षाने भाजप नेत्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन प्रभारी) के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय आहे? माहितीनुसार, २६ सप्टेंबरच्या रात्री केरळमधील एका प्रादेशिक टीव्ही चॅनलवर लडाख हिंसाचाराच्या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत भाजपचे पॅनेलिस्ट म्हणून प्रिंटू महादेव सहभागी झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी राहुल गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करत , " राहुल गांधींना छातीव...